भूपेंद्र पटेलांचा उद्या दुपारी 2.20 वाजता शपधविधी, शाह-शिवराज हजेरी लावणार

गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) उद्या दुपारी 2.20 वाजता शपथ घेणार आहेत. यानंतर दोन दिवसांनी कॅबिनेट मंत्र्यांनाही शपथ दिली जाईल.

भूपेंद्र पटेलांचा उद्या दुपारी 2.20 वाजता शपधविधी, शाह-शिवराज हजेरी लावणार

मुंबई : गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) उद्या दुपारी 2.20 वाजता शपथ घेणार आहेत. यानंतर दोन दिवसांनी कॅबिनेट मंत्र्यांनाही शपथ दिली जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वतः या शपथविधीचा एक भाग असणार आहेत. ते उद्या दुपारी 12.30 वाजता अहमदाबादला पोहोचतील. त्यांच्याशिवाय मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. (Bhupendra Patel to Take Oath at 2:20 pm Tomorrow, Amit Shah-Shivraj Singh Chouhan will attend Ceremony)

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली आहे. भाजप नेते विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. मुख्यमंत्रिपदाचा कारभार नेमका कोणाकडे सोपवला जाईल हे ताडण्यासाठी राजकीय जाणकारांकडून अनेक तर्कवितर्क लावले जात होते. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी भाजपच्या विधिमंडळ सदस्यांची आज बैठक झाली. या बैठकीत भूपेंद्र पटेल यांच्या नावावर एकमत झालं. आता पटेल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

पुन्हा पटेल मुख्यमंत्री

माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्याच मतदारसंघातून भूपेंद्र पटेल हे विक्रमी मतांनी निवडूण आलेत. गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपानं पटेल मुख्यमंत्री दिलेला आहे. हार्दीक पटेलच्या नेतृत्वात पाटीदार समाजानं आंदोलन केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना हटवून रुपाणींना मुख्यमंत्री केलं होतं. त्यावेळेसही पुन्हा पाटीदारच मुख्यमंत्री केला जाईल अशी चर्चा होती पण केलं रुपाणींना. ते जैन समाजातून येतात. आता त्यांना हटवून पुन्हा पाटीदार समाजाचा मुख्यमंत्री करण्यात आलाय. कोरोनाच्या काळात रुपाणींच्या नेतृत्व तोकडं पडल्याची टीका झाली. त्यातच भाजपला 99 जागांच्या फेऱ्याची भीती वाटतेय. त्यामुळेच रुपाणींना हटवून पुन्हा पटेल बहुल गुजरातला पटेलच मुख्यमंत्री दिला गेलाय.

विजय रुपाणी यांचा राजीनामा

विजय रुपाणी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा काल (11 सप्टेंबर) राजीनामा दिला. रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरातमध्ये एकच खळबळ उडाली होती. पत्रकार परिषद घेऊन आपण राजीनामा देत आहोत, हे त्यांनी जाहीर केले होते.

बिल्डर ते लीडर

भूपेंद्र पटेल हे गुजरातच्या घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. ते पाटीदार समाजाचे नेते आहेत. त्यांचं पाटीदार समाजावर वर्चस्व आहे. पटेल हे 59 वर्षाचे आहेत. ते अहमदाबादच्या शिलाज येथील रहिवासी आहेत. त्यांनी सिव्हील इंजीनियरिंगचा डिप्लोमा केला आहे. ते व्यवसायाने बिल्डर आहेत. विशेष म्हणजे ते पहिल्यांदाच आमदार झाले असून त्यांनी कधीही मंत्रीपद भूषविलेले नाही.

स्थायी समिती अध्यक्ष ते मुख्यमंत्री

भूपेंद्र पटेल हे गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहेत. सामाजिक आणि राजकीय चळवळीत त्यांचा सहभाग राहिला आहे. 1999-2000मध्ये ते मेमनगर नगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. 2010 ते 2015 पर्यंत ते थलतेज वॉर्डातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2015-17मध्ये ते अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते. तसेच 2008-10 मध्ये ते एएमसी स्कूल बोर्डाचे उपाध्यक्ष होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते मैदानात उतरले होते. यावेळी त्यांनी पहिल्यांदा विजय मिळवला होता. त्यानंतर साडे तीन वर्षानंतर त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. ते पटेल संघटनांच्या सरदार धाम आणि विश्व उमिया फाऊंडेशनचे ट्रस्टीही आहेत. त्यांना मुख्यमंत्री केल्याने ते पाटीदार समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोठी भूमिका निभावू शकतात.

मतदारसंघातील ‘दादा’

ते घटलोडिया विधानसभा मतदारसंघातून 1 लाख 17 हजार मताने विजयी झाले आहेत. त्यांची संघटनेवर आणि मतदारसंघावर चांगली पकड आहे. मतदारसंघातील लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना मतदारसंघात ‘दादा’ म्हणून ओळखले जाते.

इतर बातम्या

भूपेंद्र पटेलांची मुख्यमंत्रीपदी वर्णी कशी लागली?, दिल्लीत स्क्रिप्ट लिहिली, अहमदाबादेत वाचन?; वाचा सविस्तर

पहिल्यांदाच आमदार झाले आणि थेट मुख्यमंत्रीच, कोण आहेत भूपेंद्र पटेल?

गुजरात भाजपात नितीन पटेलांची बंडाची भाषा? नव्या मुख्यमंत्र्याबाबत मोठं वक्तव्य, वाचा का ट्रेंड होतंय #Nitin

(Bhupendra Patel to Take Oath at 2:20 pm Tomorrow, Amit Shah-Shivraj Singh Chouhan will attend Ceremony)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI