Gold Rate: भारतात सोने 40 हजारांवर, तर पाकिस्तानात किती?

सोन्याच्या दराने देशभरातील सराफ बाजारांमध्ये नवा विक्रम केला आहे. भारतात प्रतितोळा सोन्याचे दर 40,000 रुपये झाले आहेत. दुसरीकडे पाकिस्तानमध्ये सोन्याच्या दरांनी भारताला कितीतरी मागे टाकले आहे. पाकिस्तानमधील सोन्याचा दर ऐकून भलेभले तोंडात बोट घालत आहेत.

Gold Rate: भारतात सोने 40 हजारांवर, तर पाकिस्तानात किती?

मुंबई : सोन्याच्या दराने (Gold Rate) देशभरातील सराफ बाजारांमध्ये नवा विक्रम केला आहे. भारतात प्रतितोळा सोन्याचे दर (Gold Rate in India) 40,000 रुपये झाले आहेत. दुसरीकडे पाकिस्तानमध्ये सोन्याच्या दरांनी भारताला कितीतरी मागे टाकले आहे. पाकिस्तानमधील सोन्याचा दर ऐकून भलेभले तोंडात बोट घालत आहेत. तेथे सोन्याचे दर (Gold Rate in Pakistan) प्रतितोळा 80 हजारांच्या पार गेले आहेत.

भारतात प्रति 10 ग्रॅम सोन्याचे दर 40,000 रुपये आणि चांदीचे दर 46,000 रुपये प्रतिकिलो असे झाले आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबई, गुलाबी शहर जयपूर आणि सोन्याचा सर्वात मोठा बाजार अहमदाबादमध्ये 24 कॅरेट सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 40,000 रुपयांच्या (3 टक्के GST सह) पुढे गेले आहेत. मुंबईत सोमवारी (26 ऑगस्ट) सोन्याचे दर 40,040 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मुंबईतच चांदीचे दर 46,380 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत.

जयपूरमध्ये 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर अनुक्रमे 40,020 रुपये आणि 39,900 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तसेच चांदीचा दर 46,400 रुपये प्रति किलोग्रॅम झाला. अहमदाबादमध्ये हेच सोन्याचे दर अनुक्रमे 40,000 रुपये आणि 39,870 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तर चांदी 46,400 रुपये प्रति किलोग्रॅम झाली.

भारतात 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम आहे, तर पाकिस्तानमध्ये 1 तोळा म्हणजे 11.34 ग्रॅम आहे. पाकिस्तानात 10 ग्रॅम सोन्याचा दर 75 हजार 874 रुपयांपासून 80 हजारांपर्यंत पोहोचला आहे. तसेच हाच दर पाकिस्तानमध्ये प्रतितोळा 88,550 रुपये झाला आहे.

ट्रम्प यांच्या ट्विटने बाजारात उलथा-पालथ

सोने आणि चांदीच्या दरावर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे (IBJA) राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी मात्र, वेगळे मत व्यक्त केले. ते म्हणाले, “सध्या सोने आणि चांदीचे दर कोणत्याही मुलभूत नियमाप्रमाणे अथवा विश्लेषणात्मक आकडेवारीने वाढत नसून ट्रम्प यांच्या ट्विटनुसार होत आहे. त्यामुळेच हे दर केव्हा कमी होतील आणि कधी वाढतील हे सांगणं कठीण आहे. मात्र, सध्याच्या दरवाढीने घरगुती मागणीत 50 टक्के घट झाली आहे.”

भारतीय शेअर बाजार वधारला

केडिया कमोडिटीचे संचालक अजय केडिया म्हणाले, “अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धामुळे परदेशी बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. त्याचा परिणाम घरगुती बाजारावरही झाला आणि महागड्या धातुंच्या दराने उसळी घेतली. सोमवारी (26 ऑगस्ट) अमेरिकेचे प्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या अधिकाऱ्याशी संपर्क केल्याचे वक्तव्य केले. त्यानंतर व्यापार युद्धातील तणाव कमी होण्याची शक्यता असल्याने सोन्याच्या दरात जागतिक स्तरावर काहीशी घट झाली. भारतात देखील शेअर बाजारात 793 अंकाची वाढ पाहायला मिळाली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *