‘MIM संपूर्ण देशात आपला झेंडा फडकावणार’, बिहारमधील कामगिरीनंतर अकबरुद्दीन ओवेसींना विश्वास

अकबरुद्दीन ओवेसी यांनी शुक्रवारी बिहारमधील विजयी उमेदवारांची भेट घेतली. ओवेसी यांच्या MIMवर मुस्लिम मतांच्या विभाजनाचा आरोप ठेवला जातो. त्यावरही अकबरुद्दीन ओवेसी यांनी आपल्याला पर्वा नसल्याचं म्हटलं आहे.

'MIM संपूर्ण देशात आपला झेंडा फडकावणार', बिहारमधील कामगिरीनंतर अकबरुद्दीन ओवेसींना विश्वास
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 1:30 PM

हैदराबाद: बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वांनाच धक्का देत असदुद्दीन ओवेसी यांच्या MIM ने सीमांचल भागातील 5 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे MIMचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगला उत्साह संचारला आहे. असदुद्दीन ओवेसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांनी बिहार निवडणुतील MIMच्या कामगिरीनंतर मोठा दावा केलाय. ‘बिहारमधील MIMचा विजय हा भारताच्या राजकारणात एक नवीन तारिख लिहिल आणि MIM संपूर्ण देशात आपला झेंडा फडकवेल हे संपूर्ण भारत पाहिल’, असं वक्तव्य अकबरुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे. (Akbaruddin Owaisi’s big statement after MIM’s performance in Bihar)

बिहारमध्ये NDAच्या विजयानंतर आता सत्तास्थानपेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. अशा स्थितीत MIM ने आपल्या 5 आमदारांना हैदराबादमध्ये बोलावून घेतलं आहे. सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत आपल्या पक्षाचे आमदार फुटू नयेत म्हणून ओवेसींनी आमदारांना हैदराबादमध्ये पाचारण केल्याचं बोललं जात आहे.

अकबरुद्दीन ओवेसी यांनी शुक्रवारी बिहारमधील विजयी उमेदवारांची भेट घेतली. ओवेसी यांच्या MIMवर मुस्लिम मतांच्या विभाजनाचा आरोप ठेवला जातो. त्यावरही अकबरुद्दीन ओवेसी यांनी आपल्याला पर्वा नसल्याचं म्हटलं आहे.

बिहारमध्ये MIMचे 5 उमेदवार विजयी

बिहार विधानसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या MIMने जोरदार प्रदर्शन करत 5 जागांवर विजय मिळवला आहे. सीमांचलमधील कोचाधामन, किशनगंज, अमोर, बहादुरजंग, बैसी, ठाकुरगंज आणि जोकीहाट या विधानसभा मतदारसंघात MIMचे उमेदवार विजयी झाले आहेत.

बिहार विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान असदुद्दीन ओवेसी यांनी सातत्यानं काँग्रेस आणि RJDवर टीकास्त्र डागलं. सीमांचल परिसरातील जनतेची उपेक्षा होण्यास काँग्रेस आणि RJDच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर ओवेसी आपल्या प्रचारादरम्यान सातत्यानं NRC आणि CAA चा मुद्द्यावर मोठा जोर लावल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान ओवीसींचा MIM हा भाजपची बी टीम असल्याचा आरोप RJD आणि काँग्रेस करत राहिली.

ओवेसी म्हणजे भाजपचा बिहार निवडणुकीतील मोहरा- शिवसेना

“बिहारमध्ये भाजपचा प्रचंड विजय झाला. त्याचे श्रेय पंतप्रधान मोदी यांनाच मिळायला हवे. त्याचा आनंदोत्सवही साजरा झाला, पण आकड्यांच्या खेळात एनडीएला निसटता विजय मिळाला आहे आणि खरा विजेता 31 वर्षांचा तेजस्वी यादव हाच आहे. भाजपने याच सरशीसाठी निवडणुकीच्या रिंगणात जे मोहरे फिरवले, त्यात असदुद्दीन ओवेसी यांना पहिला क्रमांक द्यावा लागेल”, अशा शब्दात बिहार निवडणूक निकालाच्या भाजपच्या विजयाचं ‘सामना’तून वर्णन करण्यात आलं.

संबंधित बातम्या:

Bihar election result 2020: सीमांचलमध्ये असदुद्दीन ओवेसींच्या MIM चे 5 उमेदवार विजयी, बिहारमध्ये ओवेसींचं महत्व वाढलं

भाजपने निवडणुकीच्या रिंगणात जे मोहरे फिरवले, त्यात ‘ओवेसी’ यांचा पहिला क्रमांक, सामनातून भाजपवर टीकेचे बाण

Akbaruddin Owaisi’s big statement after MIM’s performance in Bihar

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.