धक्कादायक! रुग्णालयाने जिवंत कोरोना रुग्णाला केले मृत घोषित, पत्नीच्या प्रसंगावधानानं अनर्थ टळला

कोरोना पॉझिटिव्ह जिवंत रुग्णाला मृत घोषित करण्यात आले आणि त्याचे मृत्यूचे प्रमाणपत्र दिले गेले. पण पत्नीच्या प्रसंगावधानानं मोठा अनर्थ टळला. bihar pmch gave death certificate to corona patient

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:35 PM, 12 Apr 2021
धक्कादायक! रुग्णालयाने जिवंत कोरोना रुग्णाला केले मृत घोषित, पत्नीच्या प्रसंगावधानानं अनर्थ टळला
bihar pmch gave death certificate to corona patient

पाटणा: गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बिहारमध्येही कोरोनाचा मोठा फैलाव झालाय. बिहारमधील रुग्णालयातही कोरोनाची रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. त्यातच आता पाटणा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (PMCH) मध्ये एक अतिशय विचित्र घटना उघडकीस आलीय. कोरोना पॉझिटिव्ह जिवंत रुग्णाला मृत घोषित करण्यात आले आणि त्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्र दिले गेले. पण पत्नीच्या प्रसंगावधानानं मोठा अनर्थ टळला. (Bihar Pmch Gave Death Certificate To Corona Patient Wife Seeing Her Dead Body Said Not My Husband)

कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर कोविड वॉर्डात केले शिफ्ट

पीएमसीएचच्या एका डॉक्टरांनी सांगितले की, बाढ ठाण्याच्या मोहम्मदपूर येथे वास्तव्याला असलेल्या चुन्नू कुमारला ब्रेन हेमरेज झाल्याने 9 एप्रिलला पीएमसीएचमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याच्यावर कोरोना व्हायरसची चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये तो सकारात्मक आढळला. यानंतर त्याला कोरोना वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले.

घाईघाईत दिले मृत्यू प्रमाणपत्र

रविवारी रुग्णालय प्रशासनाने पत्नी आणि भावाला सांगितले की, चुन्नूचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर रुग्णालय प्रशासनाने रुग्णाचा मृतदेह चुन्नूचा भाऊ मनोजकुमार यांच्याकडे सोपविला आणि मृत्यूचे प्रमाणपत्र दिले.

अशा प्रकारे रुग्णालयाचे दुर्लक्ष उघडकीस आले

प्रशासनाच्या देखरेखीखाली त्यांना मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. त्यावेळी मृताच्या पत्नीने आपल्या पतीचा शेवटचा चेहरा पाहण्याचा आग्रह धरला. घरातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, अंतिम दर्शन घेण्यासाठी जेव्हा शरीरावरून कापड बाजूला केले गेले तेव्हा तो मृतदेह चुन्नूचा नसून दुसर्‍याच कोणाचा तरी असल्याचं उघड झाले. यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चुन्नू याच्यावर सध्या पीएमसीएच येथे उपचार सुरू आहेत. रुग्णालयाच्या प्रशासन आणि चुन्नूच्या कुटुंबीयांनीही याची खातरजमा केलीय. हयात कोरोना रुग्ण मृत असल्याचे सांगून मृत्यूचे खोटे प्रमाणपत्र देण्याच्या प्रकरणात पीएमसीएचचे अधीक्षक डॉक्टर आय. एस. ठाकूर यांनी हेल्थ मॅनेजर अंजली कुमारी यांना निलंबित केले.

संबंधित बातम्या

Video : साडीमध्ये महिलेचा खास स्टंट, व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल

Lockdown Updates: देशातील कोणत्या राज्यात लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू; वाचा, संपूर्ण लिस्ट

bihar pmch gave death certificate to corona patient wife seeing her dead body said not my husband