तरुणीसोबत चार आमदारांचा अश्लील डान्स, प्रकार कॅमेऱ्यात कैद

अनेक व्हीआयपी किंवा व्हीव्हीआयपी हे मोरेह टाऊनला सेक्स टेस्टिनेशन म्हणूनच पाहतात, असे इम्फाल टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे.

तरुणीसोबत चार आमदारांचा अश्लील डान्स, प्रकार कॅमेऱ्यात कैद

इम्फाल (मणिपूर) : मणिपूरमध्ये अभ्यास दौऱ्यासाठी गेलेल्या बिहारमधील चार आमदारांचा प्रताप व्हिडीओत कैद झाला आहे. दारुच्या नशेत असलेले बिहारमधील हे चार आमदार एका तरुणीसोबत जबरदस्तीने नाचताना दिसत आहेत. भारत-म्यानमार सीमेवरील मोरेह टाऊन येथे हा प्रकार घडला. या आमदारांमध्ये राष्ट्रीय जनता दलचे आमदार यदुवंशी कुमार यादव आणि राजा पाकर, भाजपचे आमदार सचिन प्रसाद सिंह आणि जदयूचे आमदार राज कुमार यांचा समावेश आहे.

बिहारमधील पिपरा विधानसभा मतदारसंघाचे राजदचे आमदार यदुवंशी कुमार यादव यांच्या नेतृत्त्वात आमदारांची टीम मणिपूरमध्ये अभ्यासदौऱ्याठी गेली होती. एनडीए सरकारच्या ईस्ट पॉलिसीअंतर्गत करण्यात येणाऱ्या विकासकामांचा अभ्यास करण्यासाठी हे आमदार गेले होते. एक जून रोजीच हे आमदार मोरेह टाऊन येथे पोहोचले होते.

मोरेह टाऊन सेक्स डेस्टिनेशन?

अनेक व्हीआयपी किंवा व्हीव्हीआयपी हे मोरेह टाऊनला सेक्स टेस्टिनेशन म्हणूनच पाहतात, असे इम्फाल टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे. पुरवा नसल्याने अशा घटना कधी उघडकीस आल्या नाहीत. बिहारमधील आमदारांच्या निमित्ताने पहिल्यांदा व्हीआयपी लोकांचा प्रताप समोर आला आहे.

आमदारांवर कारवाईची मागणी

बिहारमधील आमदारांच्या प्रतापाचा व्हिडीओ समोर आल्यानतंर, या चारही आमदारांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. जनतेचे प्रतिनिधी असूनही, दारु पिऊन असे अश्लील काम करणे, हे कायद्यानुसार चूक आहे. या निमित्ताने मोरेह टाऊनमधील परिस्थितीही पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. भारत-म्यानमार सीमेवर अशा किती स्त्रिया असतील, ज्या व्हीआयपी व्यक्तींच्या वासनेच्या शिकार झाल्या असतील, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *