राजस्थानच्या 15 जिल्ह्यांत बर्ड फ्लूचा कहर; 3 हजारांहून अधिक पक्ष्यांचा खात्मा, जयपूर पक्षीसंग्रहालय बंद

मुख्य वन्यजीव वार्डन मोहनलाल मिना म्हणाले की, चार ब्लॅक स्टार्क्स आणि काही बदक सोमवारी जयपूरच्या पक्षीसंग्रहालयात मृत्युमुखी पडलेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:11 PM, 12 Jan 2021
Birds Killed Jaipur Zoo

रायपूरः राजस्थानच्या 33 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांत बर्ड फ्लूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय. राज्यात 3 हजारांहून अधिक पक्षी या आजारानं मृत्युमुखी पडलेत. चार पक्ष्यांच्या मृत्यूनंतर जयपूर पक्षीसंग्रहालय बंद करण्यात आलंय, अशी माहिती मंगळवारी अधिकाऱ्यांनी दिलीय. मुख्य वन्यजीव वार्डन मोहनलाल मिना म्हणाले की, काही बदक सोमवारी जयपूरच्या पक्षीसंग्रहालयात मृत्युमुखी पडलेत. त्यानंतर पक्षीसंग्रहालय बंद करण्यात आलंय. त्यातील काही पक्षी आजारी आहेत. त्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळला पाठवण्यात आले आहेत. (Bird Flu Havoc In 15 Districts Of Rajasthan More Than 3000 Birds Killed Jaipur Zoo Closed)

जयपूर, दौसा, सवाई माधोपूर, हनुमानगड, जैसलमेर, बिकानेर, चित्तोडगड, पाली, बारां, कोटा बांसवाडा, सिरोही आणि प्रतापगड जिल्ह्यांत बर्ड फ्लू किंवा एव्हियन एन्फ्लुएंजाची खात्री पटवण्यात आलीय. राजधानी दिल्लीत बर्ड फ्लू दाखल झालाय. 8 दिवसांपूर्वीच पक्षीसंग्रहालयातील नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपासणीनंतर आलेल्या रिपोर्टनुसार 3 बदक आणि 5 कावळ्यांना बर्ड फ्लूची खात्री पटली आहे.

पक्ष्यांना संपवण्याचं ऑपरेशन सुरू

संजय लेकमध्येही काही पक्षी मृतावस्थेत सापडलेत. त्यामुळे सावधानतेच्या पार्श्वभूमीवर येत्या काही काळात पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील 3 बदकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. संजय लेकमधील पक्ष्यांना संपवण्याचं ऑपरेशन चालवलं जात आहे. जेणेकरून बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव पसरणार नाही. सोमवारी टोंक आणि करोलीमध्येही बर्ड फ्लूची खातरजमा करण्यात आलीय. गेल्या 24 तासांत 264 आणि काही कावळे मृत्युमुखी पडले आहेत. तसेच राज्यातील मृत्युमुखी पडलेल्या कावळ्यांची संख्या 2,500 वर पोहोचलीय. राजस्थानमध्ये 180 मोर, 190 कबुरतही या आजारानं ग्रस्त आहेत.

संबंधित बातम्या

Bird Flu | बर्ड फ्लू नेमका काय?, लक्षणे कोणती?, औषध काय?, सर्व प्रश्नांची उत्तरं!

Bird Flu | कोंबडीचे मांस आणि अंडी खाल्ल्याने ‘बर्ड फ्लू’चा धोका? वाचा संशोधन काय म्हणतेय…

Bird Flu Havoc In 15 Districts Of Rajasthan More Than 3000 Birds Killed Jaipur Zoo Closed