एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी ठार? अमित शाहांनी आकडा सांगितला

अहमदाबादा: जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथं 14 फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. यानंतर भारताने पुलवामाचा बदला म्हणून 26 फेब्रुवारीला पहाटे पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअरस्ट्राईक केला. वायूदलाच्या या हल्ल्यात पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानी सीमेवरील जवळपास 300 ते 350 दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त आलं. मात्र सैन्यदलाने किंवा सरकारने दहशतवाद्यांच्या मृत्यूचा आकडा जाहीर केला नाही. […]

एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी ठार? अमित शाहांनी आकडा सांगितला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:21 PM

अहमदाबादा: जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथं 14 फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. यानंतर भारताने पुलवामाचा बदला म्हणून 26 फेब्रुवारीला पहाटे पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअरस्ट्राईक केला. वायूदलाच्या या हल्ल्यात पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानी सीमेवरील जवळपास 300 ते 350 दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त आलं. मात्र सैन्यदलाने किंवा सरकारने दहशतवाद्यांच्या मृत्यूचा आकडा जाहीर केला नाही. त्यामुळे विरोधक सातत्याने मोदी सरकारला घेरत, ठार झालेल्या दहशतवाद्यांचा आकडा सांगा अशी विचारणा करत आहेत.

अशी मागणी होत असताना आता भाजाप अध्यक्ष अमित शाह यांनी याबाबतचं उत्तर दिलं आहे. अमित शाह यांनी रविवारी 3 मार्च 2019 रोजी गुजरातमधील अहमदाबादेत झालेल्या भाजपच्या सभेत ठार झालेल्या दहशतवाद्यांचा आकडा सांगितला. अमित शाह म्हणाले, “पुलवामा हल्ल्यानंतर प्रत्येक जण विचार करत होता की आणखी एक सर्जिकल स्ट्राईक केला जाऊ शकत नाही का? त्याचवेळी मोदी सरकारने 13 दिवसांनी एअर स्ट्राईक केला, ज्यामध्ये 250 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले”

भारताने 2016 मध्ये सर्जिकल स्ट्राईक केला. त्यानंतर आता 26 फेब्रुवारीला पुन्हा स्ट्राईक केल्याने, विरोधकांना ही गोष्ट पचनी पडत नाही, असा टोला अमित शाह यांनी लगावला.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एअर स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत, तर राहुल बाबा या कारवाईला राजकीय चष्म्यातून पाहात आहेत. दुसरीकडे अखिलेश यादव चौकशीची मागणी करत आहेत. अशा पद्धतीचं वक्तव्ये देशासाठी लाजिरवाणी आहेत, पाकिस्तानला अशा विधानांनी बळ मिळत आहे, असा हल्लाबोल अमित शाहांनी केला.

यावेळी अमित शाहांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावरही निशाणा साधला. आपल्या देशात मौनी बाबांचं सरकार होतं, त्यावेळी सैनिकांचं शीर धडावेगळं केलं जात होतं, मात्र आता आमचे सैनिक F16 विमान पाडतातही आणि पाकिस्तानातून परतही येतात, असं अमित शाह म्हणाले.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.