भाजपची मोठी घोषणा, राम विलास पासवान यांच्या रिक्त जागेवर सुशील मोदींना राज्यसभेची उमेदवारी

भाजप नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी (Rajya Sabha Byelection) दिली आहे.

भाजपची मोठी घोषणा, राम विलास पासवान यांच्या रिक्त जागेवर सुशील मोदींना राज्यसभेची उमेदवारी


नवी दिल्ली : भाजपने बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी (Sushil Kumar Modi) यांना राज्यातून केंद्रात नेण्याचा निर्णय घेतलाय. त्याचाच भाग म्हणून आता सुशील कुमार मोदी यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी (Rajya Sabha Byelection) दिली आहे. नुकतीच रामविलास पासवान यांची राज्यसभेतील जागा रिक्त झाली आहे. त्या जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे सुशील कुमार मोदी केंद्रातील राजकारणात गेल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे नुकतीच सुशील मोदी यांनी बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदासाठी डावलल्याने काहीशी नाराजीही व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे (BJP chooses Sushil Kumar Modi for Bihar Rajya Sabha byelection after demise of Ram Vilas Paswan).

माजी केंद्रीय मंत्री आणि लोजपचे प्रमुख राम विलास पासवान यांच्या निधनानंतर राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे. आता भाजपने ही जागा लोजपला न घेता स्वतःकडे ठेवली आहे. त्या जागेसाठीच सुशील मोदी निवडणूक रिंगणात असणार आहेत. बिहारमधील राज्यसभेच्या या जागेसाठी निवडणूक आयोगाने (Election commission) तयारी सुरु केली आहे. या जागेसाठी 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. बिहारमधील भाजपचं संख्याबळ पाहता सुशील कुमार मोदी निवडून येणं निश्चित मानलं जात आहे.

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 3 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज करता येणार आहे. 4 डिसेंबरला या अर्जांची छानणी होईल. उमेदवार 7 डिसेंबरपर्यंत आपले अर्ज मागे घेऊ शकतील. त्यानंतर गरज पडल्यास 14 डिसेंबरला या जागेसाठी मतदान होईल. सकाळी 9:00 ते सायंकाळी 4:00 वाजेपर्यंत हे मतदान होईल. यानंतर निकाल घोषित होईल.

संबंधित बातम्या :

अमित शाहांना विमानतळावर भेटले, पण भाजप कार्यालयात एकत्र गेले नाहीत, सुशील कुमार मोदी खरंच नाराज?

कार्यकर्तापद कुणीही हिसकवू शकत नाही, बिहारच्या माजी उपमुख्यमंत्र्यांचं सूचक ट्विट

बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडून नवा चेहरा?

व्हिडीओ पाहा :

BJP chooses Sushil Kumar Modi for Bihar Rajya Sabha byelection after demise of Ram Vilas Paswan

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI