बुटाने मारणाऱ्या खासदाराचं तिकीट कापलं, भाजपकडून रवी किशनलाही उमेदवारी

बुटाने मारणाऱ्या खासदाराचं तिकीट कापलं, भाजपकडून रवी किशनलाही उमेदवारी

नवी दिल्ली : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची 21 वी यादी जाहीर केली. यामध्ये उत्तर प्रदेशातील सात नावांचा समावेश आहे. आमदाराला बुटाने मारल्यामुळे चर्चेत आलेल्या खासदाराचं तिकीट भाजपने कापलंय. संत कबीर नगरचे खासदार शरद त्रिपाठी यांनी त्यांच्याच पक्षाच्या आमदाराला बुटाने मारलं होतं. शरद त्रिपाठी यांचे वडील आणि उत्तर प्रदेश भाजपचे माजी अध्यक्ष राम त्रिपाठी यांना भाजपने देवरियामधून उमेदवारी दिली आहे.

भाजपच्या यादीचं वैशिष्ट्य म्हणजे भोजपुरी अभिनेता रवी किशनलाही तिकीट देण्यात आलंय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या गोरखपूरमधून रवी किशनला उमेदवारी देण्यात आली आहे. रवी किशनने 2014 ला काँग्रेसमधून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. पण त्याला अपयश आलं. यानंतर त्याने काँग्रेसला रामराम ठोकत 2017 मध्ये भाजपात प्रवेश केला.

बुटाने मारणाऱ्या खासदाराचा पत्ता कट

भाजप खासदार शरद त्रिपाठी आणि भाजपचेच आमदार राकेश सिंह यांच्यात तुफान मारामारी झाली होती. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विकासकामांचं उद्घाटन करताना नावं लिहिण्यावरुन हा वाद झाला, ज्याचं रुपांतर हाणामारीत झालं. हा वाद सुरु होताच खासदार त्रिपाठी यांनी आमदाराला बाहेर ओढून ओढून मारलं. उपस्थित मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. पण खासदार महोदय प्रचंड संतापले होते.

मारहाणीचा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *