BJP Politics : ‘दलित असल्यानं भेदभाव’ अमित शाह यांना पत्र लिहित यूपीतील भाजप मंत्र्याचा राजीनामा

विशेष म्हणजे बदलीच्या विभागात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. या प्रकरणी अधिकाऱ्यांकडून माहिती मागितली असता त्यांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. असेही त्यांनी पत्रात लिहिले आहे.

BJP Politics : 'दलित असल्यानं भेदभाव' अमित शाह यांना पत्र लिहित यूपीतील भाजप मंत्र्याचा राजीनामा
BJP Politics : 'दलित असल्यानं भेदभाव' अमित शाह यांना पत्र लिहित यूपीतील भाजप मंत्र्याचा राजीनामा Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 8:35 AM

मुंबई – योगी सरकारमधील जलशक्ती राज्यमंत्री दिनेश खाटिक (Dinesh Khatik) सहज म्हणून राजीनामा दिलेला नाही. त्या मागची कहाणी मोठी आहे. राजीनामा देण्यामागे त्यांनी एक मोठे कारण सांगितले आहे. मी दलित जातीचा आहे, त्यामुळे विभागात माझ्याशी भेदभाव केला जात असल्याचे खुल्या पत्रात लिहिले आहे. तसेच त्यांनी त्यांच्यावरती आत्तापर्यंत झालेल्या अन्यायाची आपली संपूर्ण व्यथा मांडली आहे. राजीनामा दिल्याने युपीतील राजकीय (UP Politics) घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे अमित शहा (Amit Shah) या प्रकऱणावरती काय निर्णय घेतात ते पाहावे लागेल.

दलित समाजाचे राज्यमंत्री असल्याने माझ्या कोणत्याही आदेशावर कारवाई होत नाही

जलशक्ती राज्यमंत्री दिनेश खाटिक यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सरकारच्या कारभारावर आणि खात्यातील भ्रष्टाचारावर मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकारी योजनेतील नियमांकडे दुर्लक्ष करून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला जात असल्याचे त्यांनी पत्रात लिहिले आहे. जलशक्ती विभागात दलित समाजाचे राज्यमंत्री असल्याने माझ्या कोणत्याही आदेशावर कारवाई होत नाही. एवढेच नाही तर मला कोणत्याही बैठकीची माहितीही दिली जात नाही. विभागात सध्या कोणत्या योजना सुरू आहेत, त्यावर कोणती कारवाई सुरू आहे. याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून दिली जात नाही असं त्यांनी पत्रात लिहीलं आहे.

हे सुद्धा वाचा

बदलीच्या विभागात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे देखील त्यांनी सांगितले

विशेष म्हणजे बदलीच्या विभागात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. या प्रकरणी अधिकाऱ्यांकडून माहिती मागितली असता त्यांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. असेही त्यांनी पत्रात लिहिले आहे. त्याचबरोबर विभागप्रमुखांनाही फोनवरून माहिती देण्यास सांगितले असता माहिती देण्यात आली नाही. प्रधान सचिव अनिल गर्ग यांनी माझी संपूर्ण प्रकरण न ऐकून घेता माझा फोन ठेवला. असे न ऐकता फोन कट करणे हा एका राज्यमंत्र्याचा मोठा अपमान आहे, असे त्यांनी लिहिले आहे.

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.