झारखंडमध्ये सरकार पाडण्याचा भाजपाचा डाव फसला? प. बंगालमध्ये कॅशसह सापडलेले झारखंडचे तीन आमदार काँग्रेसमधून निलंबित

प. बंगालमध्ये शुक्रवारी जे काही उघडकीस आले ते भाजपाचे ऑपरेशन लोटस नव्हे तर ऑपरेशन चिखल होते, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते पवन खेडा यांनी केली आहे. झारखंडमध्ये हेमंत सोरेन सरकारला हटवण्यासाठी मोठ्या धनाचा वापर केला आहे, असा आरोप झारखंड प्रदेश काँग्रेसने केला आहे.

झारखंडमध्ये सरकार पाडण्याचा भाजपाचा डाव फसला? प. बंगालमध्ये कॅशसह सापडलेले झारखंडचे तीन आमदार काँग्रेसमधून निलंबित
झारखंडध्ये ऑपरेशन लोटस?Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 3:06 PM

नवी दिल्ली – प. बंगालच्या ( W. Bangla)हावडामध्ये लाखो रुपयांच्या रोख रकमेसह अटक करण्यात आलेले झारखंडचे तीन काँग्रेसच्या आमदारांना पक्षाने निलंबित (3 Congress MLA suspended) केले आहे. झारखंड प्रदेश काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी ही घोषणा केली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत भाजपा (Operation Lotus)झारखंडमध्ये सरकार पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. सध्या एक मुख्यमंत्री सगळ्या आमदारांच्या संपर्कात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसंच एक केंद्रीय मंत्री आमदारांना ईडीची भीती दाखवर आहेत. अविनाश पांडे यांनी आरोप केला की – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या ८ वर्षांत देशात बेरोजगारी, महागाई आणि आर्थिक विपन्नतेचा इतिहास रचण्यात आला. आत्ता चिंतेची बाब ही आहे की, लोकशाहीच्या चिंधड्या उडवण्यात येत आहेत, निवडून आलेल्या सरकारांना हटवण्यासाठी देशात नंगा नाच घालण्यात येतो आहे. ज्या ज्या राज्यात गैरभाजपा सरकारं आहेत, तिथे ईडी आणि केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करुन ती सरकारे अस्थिर करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

झारखंड सरकार सुरक्षित, 5 वर्षे पूर्ण करणार

झारखंड सरकार सुरक्षित आहे. सरकारला कोणताही धोका नाही आणि सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करील असा दावाही त्यांनी केला आहे. लोकप्रतिनिघी, काँग्रेस पक्षातील जबाबदारी असलेले पदाधिकारी किंवा सामान्य कार्यकर्ता, या सगळ्यांची माहिती आमच्याकडे आहे. जो कुणीही या भाजपाच्या सरकार उलथवण्याच्या कटात सहभागी असल्याचे समोर येईल, त्याच्याविरोधात पक्ष कारवाई करेल, असेही काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास प. बंगालमध्ये हावडाजवळ, झारखंडच्या एका काँग्रेस आमदाराची गाडी पकडण्यात आली, त्यात कोट्यवधी रुपये असल्याची माहिती आहे. या गाडीतून पूर्व मिदनापूरकडे जात असलेल्या तीन आमदारांना यावेळी अटक करण्यात आली होती.

हे भाजपाचे ऑपरेशन चिखल – पवन खेडा

तर दुसरीकडे प. बंगालमध्ये शुक्रवारी जे काही उघडकीस आले ते भाजपाचे ऑपरेशन लोटस नव्हे तर ऑपरेशन चिखल होते, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते पवन खेडा यांनी केली आहे. झारखंडमध्ये हेमंत सोरेन सरकारला हटवण्यासाठी मोठ्या धनाचा वापर केला आहे, असा आरोप झारखंड प्रदेश काँग्रेसने केला आहे. सोरेन यांच्या झारखंडमधील सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या दोन्ही पक्षांचा समावेश आहे.

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.