शत्रूंना रात्रंदिवस धाकात ठेवणार, जगातील सर्वात ताकदवर हेलिकॉप्टर अपाचे भारतीय वायूसेनेत दाखल

जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात बलाढ्य वायूसेना मानली जाणारी भारतीय वायूसेनेची (Indian Air Force) ताकद आणखी वाढली आहे. जगातील सर्वात ताकदवर लढाऊ हेलिकॉप्टर अपाचे (Boeing AH-64 Apache Helicopter) मंगळवारी (3 सप्टेंबर) भारतीय वायूसेनेत भरती झालं.

शत्रूंना रात्रंदिवस धाकात ठेवणार, जगातील सर्वात ताकदवर हेलिकॉप्टर अपाचे भारतीय वायूसेनेत दाखल

पठानकोट : जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात बलाढ्य वायूसेना मानली जाणारी भारतीय वायूसेनेची (Indian Air Force) ताकद आणखी वाढली आहे. जगातील सर्वात ताकदवर लढाऊ हेलिकॉप्टर अपाचे (Boeing AH-64 Apache Helicopter) मंगळवारी (3 सप्टेंबर) भारतीय वायूसेनेत भरती झालं. अमेरिकेच्या वायूसेनेत असलेलं AH-64E अपाचे हेलिकॉप्टर हे वायूसेना प्रमुख बीएस धानोआ यांच्या उपस्थितीत पठानकोट एअरबेसवर (Pathankot Air Force Station) वायूसेनेत भरती झालं.

भारतीय वायूसेनेने बोईंग कंपनीला 22 AH-64E अपाचे (Apache) हेलिकॉप्टर तयार करण्याचा ऑर्डर दिला आहे. त्यापैकी पहिले आठ हेलिकॉप्टर भारतात पोहोचले आहेत. येत्या वर्षभरात हे सर्व 22 हेलिकॉप्टर वायूसेनेत दाखल होतील.

AH-64E अपाचे हेलिकॉप्टर वापरणारा भारत 14 वां देश

अपाचेमधील मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स सिस्टममुळे जगातील सर्वात प्रगत लढाऊ हेलिकॉप्टर मानला जातो. अमेरिकेने 1991 मध्ये खाडी युद्धादरम्यान इराकविरोधात आणि अफगानिस्तानमधील तालिबानविरोधातील युद्धात वापर केला. भारत अपाचे वापरणारा जगातील 14 वां देश आहे.

अपाचेची वैशिष्ट्ये काय?

  • AH-64E अपाचे हेलिकॉप्टर हा 16 फूट उंच आणि 18 फूट रुंद आहे. याला उडवण्यासाठी दोन वैमानिकांची गरज असते.
  • अपाचे हेलिकॉप्टरच्या मोठ्या पंखांना चालवण्यासाठी दोन इंजिन असतता. त्यामुळे या हेलिकॉप्टरचा वेग खूप जास्त असतं.
  • वेग : 280 किलोमीटर प्रती तास
  • अपाचे हेलिकॉप्टरच्या डिझाईनमुळे याला रडारवर पकडणे कठीण असते.
  • बोईंगनुसार, बोईंग आणि अमरिकेच्या लष्करामध्ये एक करार झाला आहे. या करारानुसार कंपनी AH-64E अपाचे हेलिकॉप्टर च्या देखरेखीसाठी नेहमी सेवा देईल मात्र त्या मोफत नसतील.
  • AH-64E अपाचे हेलिकॉप्टरमध्ये 16 अँटी टँक मिसाईल सोडण्याची क्षमता आहे.
  • AH-64E अपाचे हेलिकॉप्टरच्या खाली लागलेल्या रायफलमध्ये एकावेळी 30 एमएमच्या 1, 200 गोळ्या भरल्या जाऊ शकतात.
  • फ्लाइंग रेंज : जवळपास 550 किलोमीटर
  • AH-64E अपाचे हेलिकॉप्टर हा पावणे तीन तासांपर्यंत उडू शकतो.

अपाचे हेलिकॉप्टर : शत्रूंना रात्रंदिवस धाकात ठेवणार

AH-64E अपाचे हेलिकॉप्टर रात्रीच्या अंधारातही शत्रूवर हल्ला करण्यात सक्षम आहे. अमेरिका ते इस्त्राईलपर्यंतच्या लष्करात याला स्थान आहे. अपाचेने अफगानिस्तान, ईराक आणि गजा पट्टीवर लष्कराच्या अभियानांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अपाचेला पाक अधिकृत काश्मीर (POK)सोबतच इतर दहशतवादी ठिकाणांवर हल्ला चढवण्यासाठी वापरले जाऊ शकते. हा जवळपास 20 हजार फूट उंचीपर्यंत उडू शकतो.

संबंधित बातम्या :

भारतीय वायूसेना आणखी सक्षम, HAL चं लढाऊ हेलिकॉप्टर तयार

भारतीय लष्कराची मोठी कारवाई, पाकच्या 5 ते 7 घुसखोरांचा खात्मा

भारतीय सैन्याच्या हालचालींनी पाकिस्तानला 4 दिवसात 2100 कोटींचं नुकसान!

स्कॉर्पिअन श्रेणीतील ‘वेला’ पाणबुडी भारतीय नौदलात दाखल

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *