‘बॉर्डर’चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड!

मोहाली : ‘बॉर्डर’चे खरे ‘हिरो’ काळाच्या पडद्याआड गेले आहेत. ब्रिगेडियर कुलदीपसिंह चांदपुरी यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. मोहालीस्थित फोर्टीस हॉस्पिटलमध्ये पहाटे ब्रिगेडियर चांदपुरी यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 78 वर्षांचे होते. 1971 च्या युद्धातील पारक्रम 1971 साली झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान युद्धात लोंगेवाला चेकपोस्टवर ब्रिगेडियर चांदपुरी यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. ब्रिगेडियर चांदपुरी यांनी […]

'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड!
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 5:02 PM

मोहाली : ‘बॉर्डर’चे खरे ‘हिरो’ काळाच्या पडद्याआड गेले आहेत. ब्रिगेडियर कुलदीपसिंह चांदपुरी यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. मोहालीस्थित फोर्टीस हॉस्पिटलमध्ये पहाटे ब्रिगेडियर चांदपुरी यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 78 वर्षांचे होते.

1971 च्या युद्धातील पारक्रम

1971 साली झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान युद्धात लोंगेवाला चेकपोस्टवर ब्रिगेडियर चांदपुरी यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. ब्रिगेडियर चांदपुरी यांनी पाकिस्तानच्या तब्बल 2 हजार सैनिकांचा मुकाबला केला होता आणि पाकच्या सैनिकांना धूळ चारली होती. ब्रिगेडियर चांदपुरी यांच्या धडाकेबाज कामगिरीने पाकिस्तानच्या सैनिकांना 40 टँकसोबत माघारी धाडले होते. पाकिस्तानच्या हजारो सैनिकांचा सामना करण्यासाठी ब्रिगेडियर चांदपुरी यांच्यासोबत त्यावेळी केवळ 90 सैनिक होते.

भारत-पाकिस्तान युद्धातील ब्रिगेडियर यांच्या या पराक्रमाची भारत सरकारने दखल घेतली आणि ‘महावीर चक्र’ देऊन गौरव केलं. ‘महावीर चक्र’ हा सैन्यातील दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे.

‘बॉर्डर’ सिनेमाचं प्रेरणास्रोत

प्रसिद्ध अभिनेता सनी देओल याचा 1997 साली प्रदर्शित झालेला ‘बॉर्डर’ सिनेमा ब्रिगेडियर कुलदीपसिंह चांदपुरी यांच्या आयुष्यावर आधारित होता. बॉर्डर सिनेमाचे कथानक ब्रिगेडियर चांदपुरी यांच्या आयुष्यातील घटनांवर बेतलेले होते. हा सिनेमा प्रसिद्ध दिग्दर्शक जेपी दत्ता यांनी दिग्दर्शित केला होता.

अभिनेता सनी देओलची ब्रिगेडियर कुलदीपसिंह चांदपुरी यांना श्रद्धांजली :

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची ब्रिगेडियर कुलदीपसिंह चांदपुरी यांना श्रद्धांजली :

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें