पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्याची ब्लू प्रिंट सादर करणारे बीएस धानोआ

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून भारतीय वायूसेनेने शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला. 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. अवघ्या 12 दिवसात भारताने याचा बदला घेतला. मंगळवारी पहाटे साडे तीन वाजता वायूसेनेने ही कारवाई केली. यानंतर सकाळी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक झाली. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी कारवाईबाबत …

पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्याची ब्लू प्रिंट सादर करणारे बीएस धानोआ

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून भारतीय वायूसेनेने शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला. 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. अवघ्या 12 दिवसात भारताने याचा बदला घेतला. मंगळवारी पहाटे साडे तीन वाजता वायूसेनेने ही कारवाई केली. यानंतर सकाळी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक झाली. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी कारवाईबाबत माहिती दिली. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचे 25 टॉप कमांडर मारल्याचंही त्यांनी सांगितलं.

उरी हल्ला झाला तेव्हा भारताने पीओकेमध्ये घुसून दहशतवाद्यांना मारलं होतं. यावेळी त्याच्याही पुढे जात म्हणजे पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये जाऊन हल्ला केला. वायूसेनेच्या या ऑपरेशनचं नेतृत्त्व केलं ते एअर फोर्स चीफ मार्शन बिरेंद्र सिंह धानोआ यांनी. पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी एअर स्ट्राईकची आयडिया त्यांनी दिली आणि सरकारकडूनही याला तातडीने मंजुरी मिळाली. त्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाहीचं नियोजन सुरु झालं. सरकार आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचीही यामध्ये भूमिका असली तरी धानोआ यांचा प्रदीर्घ अनुभव यासाठी कामी आला.

कोण आहेत बीएस धानोआ?

बीएस धानोआ यांना 37 वर्षांचा अनुभव आहे. पुलवामा हल्ल्याचा बदला कसा घ्यायचा याची आयडिया त्यांनीच दिली. विशेष म्हणजे बीएस धानोआ यांना रात्रीच्या वेळी हल्ला कसा करायचा याचा विशेष अनुभव आहे.

पाकिस्तानसोबत झालेल्या कारगिल युद्धात बीएस धानोआ यांनी स्क्वाड्रन म्हणून जबाबदारी घेतली आणि तत्कालीन एअर चीफ मार्शल एवाय टिपणीस यांच्यासोबत समन्वय साधत शत्रूंना पळता भूई थोडी केली होती. कारगिल युद्धात वायूसेनेने जी कामगिरी केली होती, त्यामध्ये धानोआ यांचा मोलाचा वाटा होता.

बीएस धानोआ यांनी विविध क्षेत्रात काम केलंय. फायटर बेसचे कमांडर म्हणून तर त्यांनी जबाबदारी पाहिलीच आहे, शिवाय भारतीय लष्कराला त्यांनी परदेशातही प्रशिक्षणासाठी नेलं आहे.

1999 साली धानोआ यांचा वायूसेना पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. तर 2015 मध्ये त्यांचा अति विशेष सेवा मेडल देऊन सन्मान करण्यात आला होता.

भारतीय वायू सेनेने नष्ट केलेल्या दहशतवाद्यांच्या कॅम्पमध्ये फायरिंज रेंज, स्फोटक परिक्षण केंद्र, प्रशिक्षकांसाठी वातानुकूलित कार्यालये, प्रशिक्षण घेणाऱ्या दहशतवाद्यांसाठी सुविधा, स्विमिंग पूल, मनोरंजन केंद्र अशा सर्व सुविधा या कॅम्पमध्ये होत्या. यासाठी पैसा पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराकडून दिला जायचा. पुलवामा हल्ल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहशतवादी जमा झाले होते.

भारतीय वायूसेनेच्या कारवाईत दहशतवादी, प्रशिक्षक, टॉप कमांडर आणि जिहादी मारले गेले. मारल्या गेलेल्या कमांडरमध्ये जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरचे दोन भाऊ आणि मेहुण्याचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या कॅम्पमध्ये 42 आत्मघातकी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं. या दहशतवाद्यांची यादीच भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *