‘भाजप नेत्यांना पळवून पळवून मारू’

मुरादाबाद : बहूजन समाज पार्टीचे नेते विजय यादव हे सध्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त विधानासाठी चर्चेचा विषय ठरले आहेत. विजय यादव यांनी भाजपच्या नेत्यांना मारहाण करण्याचं वक्तव्य केलं. 15 जानोवारीला बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी 63 वा जन्मदिवस साजरा केला. या निमित्ताने मुरादाबाद येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच …

‘भाजप नेत्यांना पळवून पळवून मारू’

मुरादाबाद : बहूजन समाज पार्टीचे नेते विजय यादव हे सध्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त विधानासाठी चर्चेचा विषय ठरले आहेत. विजय यादव यांनी भाजपच्या नेत्यांना मारहाण करण्याचं वक्तव्य केलं. 15 जानोवारीला बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी 63 वा जन्मदिवस साजरा केला. या निमित्ताने मुरादाबाद येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात विजय यादव यांनी ‘भाजप नेत्यांना पळवून पळवून मारू’, असे वादग्रस्त वक्तव्य केले.

“देशातील सर्वात मोठा भ्रष्ट पक्ष भाजप आहे. काँग्रेसने इंदिरा गांधी, राजीव गांधी सोनिया गांधी दिलेत. तर भाजपने मोदी, निरव मोदी, ललित मोदी आणि अबांनीच्या मांडीवर बसलेला नरेंद्र मोदी”, अशा शब्दांत विजय यादवांनी भाजपची खिल्ली उडवली.

इतकच नाही तर “नरेंद्र मोदींनी फक्त उद्योगपतींसाठी काम केले, गरीबांसाठी काहीही केले नाही. या भाजप वाल्यांना पळवून पळवून मारू. घाबरायचं कारण नाही, आज सपा-बसपा एकत्र आल्याने यांना यांची आजी आठवली असेल”, असे वादग्रस्त वक्तव्य विजय यादव यांनी केले.


आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सपा-बसपाच्या युतीचा उत्साह मायावती यांच्या वाढदिवशीही बघायला मिळाला. बसपा नेता सुधीन्द्र भदौरीया यांनी ट्विटरवर एक पोस्टर शेअर करत ट्वीट केले की, ‘बसपा प्रमुख मायावती या पंतप्रधान व्हाव्या असे माझे स्वप्न आहे’.

मायावतींनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत सांगितले की, ’12 जानेवारीला आमच्या पक्षाने समाजवादी पक्षासोबत युती करत लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भाजपची झोप उडाली आहे. देशाचे सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश असल्याने ते महत्त्वाचे आहे. केंद्रात कुणाची सरकार येणार आणि पुढील पंतप्रधान कोण होणार याचा निर्णय उत्तर प्रदेशवर अवलंबून असतो’.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *