Budget 2019: अर्थमंत्री सीतारमण यांनी सुटकेस बदलली, नवी बजेट बॅग

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मात्र, बॅग ऐवजी लाल रंगाचे फोल्डर वापरले आहे. सीतारमण यांनी यावेळी अर्थसंकल्पाच्या पंरपरेला पूर्णपणे छेद दिला आहे.

Budget 2019: अर्थमंत्री सीतारमण यांनी सुटकेस बदलली, नवी बजेट बॅग

नवी दिल्ली: आतापर्यंत आपण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना सर्व अर्थमंत्र्यांसोबत एक बजेट सुटकेस पाहिली असेल. ती कधी काळ्या रंगाची होती, तर कधी लाल रंगाची. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मात्र, सुटकेस ऐवजी लाल रंगाचे फोल्डर वापरले आहे. सीतारमण यांनी यावेळी अर्थसंकल्पाच्या पंरपरेला पूर्णपणे छेद दिला आहे. यावेळी अर्थसंकल्पाला अर्थसंकल्प न म्हणता ‘वहीखातं’ म्हटलं आहे.

दरवर्षी अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री सुटकेससोबत माध्यमांना फोटोसाठी पोज देताना दिसतात. मात्र, सीतारमण यांनी यात बदल केला. अर्थमंत्री सीतारमण संसद भवनात जाण्याआधी आपल्या अर्थसंकल्पीय टीमसह मंत्रालयाबाहेर दिसल्या. यावेळी त्यांच्या हातात अर्थसंकल्पाची लाल रंगाची सुटकेस नव्हती. त्याऐवजी त्यांनी ऐवजी लाल रंगाची फोल्डर बॅग वापरलेली पाहायला मिळाली. त्यावर अशोक स्तंभाचे चिन्हही दिसत होते. हा बदल प्रथमच पाहायला मिळत आहे.

बजेट बॅगचा इतिहास

(माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा 1998 ते 2003 चा अर्थसंकल्प सादर करताना माध्यमांसमोर फोटो पोज देताना)

सीतारमण देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. स्वातंत्र्यानंतर देशाचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला तेव्हा तत्कालीन अर्थमंत्री आर. के. शण्मुखम शेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी अर्थसंकल्पाची कागदपत्रे ठेवण्यासाठी लेदर बॅगचा उपयोग केला होता.

(2003-2004 चा अर्थसंकल्प सादर करताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन अर्थमंत्री जसवंत सिन्हा. सिन्हा यांनी इतर अर्थमंत्र्यांप्रमाणे सुटकेस न वापरता  तपकिरी रंगाच्या फाईलचा उपयोग केला होता.)

(यूपीए सरकारच्या काळात 2013-2014 रोजी तत्कालीन अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांनी वापरलेली सुटकेस.)

आतापर्यंत अर्थसंकल्पासाठी वापरण्यात येणाऱ्या बॅगचा आकार जवळजवळ सारखाच राहिला आहे. मात्र, बॅगचा रंग अनेकदा बदलला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 1991 मध्ये काळ्या रंगाच्या बॅगमध्ये मोठे आर्थिक बदल आणणारा अर्थसंकल्प सादर केला होता.

(माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी 1996-1998, 2004-2009, 2013-2014 या वेगवेगळ्या काळात अर्थसंकल्प मांडताना वापरलेली सुटकेस.)

पंडित जवाहरलाल नेहरू, यशवंत सिन्हा यांनी देखील काळ्या बॅगचा उपयोग केला होता. प्रणब मुखर्जी यांनी मात्र लाल रंगाच्या ब्रीफकेसचा उपयोग केला होता. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हातात तपकिरी आणि लाल रंगाची ब्रीफकेस पाहायला मिळाली होती.

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2014-2019 पर्यंतच्या आपल्या कार्यकाळात अर्थसंकल्प सादर करताना वेगवेगळ्या प्रकारच्या सुटकेस वापरल्या होत्या.

माजी अर्थमंत्री पीयुष गोयल यांनी यावर्षी (वर्ष 2019) अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी लाल ब्रीफकेसचा उपयोग केला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *