देशातील सर्वात घातक कमांडो फोर्स तयार

नवी दिल्ली : देशाच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. काल (15 मे) देशामध्ये भूदल, वायू दल आणि नौदलांचे अधिकारी मिळून पहिले ट्राय सर्व्हिस कमांडो फोर्स तयार करण्यात आली आहे. या फोर्समध्ये वायू दल, भूदल आणि नौदलातील अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. दहशतवाद विरोधी कारवायांना उत्तर देण्यासाठी या फोर्सचा वापर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र …

देशातील सर्वात घातक कमांडो फोर्स तयार

नवी दिल्ली : देशाच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. काल (15 मे) देशामध्ये भूदल, वायू दल आणि नौदलांचे अधिकारी मिळून पहिले ट्राय सर्व्हिस कमांडो फोर्स तयार करण्यात आली आहे. या फोर्समध्ये वायू दल, भूदल आणि नौदलातील अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. दहशतवाद विरोधी कारवायांना उत्तर देण्यासाठी या फोर्सचा वापर होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्यावर्षी ट्राय सर्व्हिस कमांडो फोर्स तयार करण्यासाठी मंजूरी दिली होती. मेजर जनरल ए. के. ढिंगरा हे आर्म्ड फोर्से स्पेशल ऑपरेशन्स डिव्हीजन (एएफएसजोडी) चे अध्यक्ष असणार आहेत. ही फोर्स इंटीग्रेटेड डिफेंस स्टाफ (आयडीएस) सोबत काम करणार आहे.

या डिव्हीजनच्या माध्यमातून देशात आणि देशाबाहेर दहशतवादविरोधी अभियान सुरु केले जाईल. यामध्ये नौसेनेचे मरीन कमांडो, वायू सेनेचे गरुड आणि विशेष दलातील 3 हजार कमांडोंचा समावेश करण्यात येणार आहे. सध्या प्रत्येक दलातील कमांडो वेगवेगळ्या संरचनेप्रमाणे काम करत आहेत.

गेल्यावर्षी ठेवण्यात आला होता प्रस्ताव

यूनीफाईड स्पेशल फोर्स तयार करण्यासाठीचा प्रस्ताव सायबरस्पेस, अंतरीक्ष आणि विशेष अभियानाचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारकडे ठेवण्यात आला होता.

दरम्यान, एअर व्हाईस मार्शल एसपी धाकड डिफेन्स स्पेस एजेन्सी (डीएसए) च्या प्रमुखपदी काम करतील. सध्या त्यांच्या नावाची अधिकृतपणे घोषण केलेली नाही. तिन्ही एजन्सी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये सुरु होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *