देशाबाहेर जाण्याच्या तयारीत असलेल्या बिल्डर युसूफ लकडावालाला अटक

मुंबई: जमीन खरेदीप्रकरणी सरकारी कागदपत्रामध्ये फेरफार करत पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली बिल्डर युसूफ लकडावाला (74) याला अहमदबाद आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनमध्ये पळून जाण्याच्या तयारी असलेल्या लकडावाला याला अटक करण्यात आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री साधना यांना 2010 मध्ये सांताक्रुज येथील जमिनीसाठी धमकावल्याप्रकरणी साधना यांनी बिल्डर युसूफ लकडावाला यांच्याविरोधात तक्रार दाखल …

, देशाबाहेर जाण्याच्या तयारीत असलेल्या बिल्डर युसूफ लकडावालाला अटक

मुंबई: जमीन खरेदीप्रकरणी सरकारी कागदपत्रामध्ये फेरफार करत पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली बिल्डर युसूफ लकडावाला (74) याला अहमदबाद आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनमध्ये पळून जाण्याच्या तयारी असलेल्या लकडावाला याला अटक करण्यात आली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री साधना यांना 2010 मध्ये सांताक्रुज येथील जमिनीसाठी धमकावल्याप्रकरणी साधना यांनी बिल्डर युसूफ लकडावाला यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र न्यायलयाने याप्रकरणी लकडावाला यांची निर्दोष सुटका केली होती.

त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात खंडाळ्यातील सुमारे 50 कोटी रुपयांची 4 एकर 38 गुंठे जमीन विकत घेण्यासाठी जमिनीच्या सरकारी कागदपत्रात फेरफार केल्याचा आरोप लकडावालावर आहे.  विशेष म्हणजे  हा प्रकार उघडकीस येऊ नये यासाठी त्यांनी सरकारी नोंदीतील पुरावेदेखील अन्य आरोपी साथीदाऱ्यांच्या हस्ते नष्ट केले. त्यानंतर जितेंद्र बडगुजर या व्यक्तीने बिल्डर युसूफ लकडावाला आणि मोहन नायर या दोघांविराधात आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली होती. यानंतर त्याच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरु केला. तसेच लकडावाला यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने लूक आऊट नोटीसही जारी केली होती.

त्यानुसार आज पहाटेच्या सुमारास लकाडावाला अहमदबादमध्ये लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच तो देश सोडून जाण्याच्या तयारीतही असल्याचे सूत्रांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी लकडावाला याचा शोध घेतला आणि  देश सोडून जाण्याच्या तयारीत असताना अहमदबाद पोलिसांनी अहमदबाद विमानतळावर त्याच्या मुसक्या आवळल्या. सध्या बिल्डर युसूफ लकडावाला अहमदबाद पोलिसांच्या ताब्यात असून लवकरच त्याला मुंबईत आणले जाणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *