दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला केंद्राकडून 4,714 कोटींचं पॅकेज जाहीर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी केंद्र सरकारने 4 हजार 714 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी या संदर्भात घोषणा केली. राज्यातील 26 जिल्ह्यातील 151 तालुक्यात दुष्काळ आहे. राधामोहन सिंह यांनी घोषणेत नेमके काय सांगितले? “केंद्र सरकारकडून दुष्काळाचा सामना करण्यासाठी कर्नाटक राज्यासाठी 949 …

दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला केंद्राकडून 4,714 कोटींचं पॅकेज जाहीर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी केंद्र सरकारने 4 हजार 714 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी या संदर्भात घोषणा केली. राज्यातील 26 जिल्ह्यातील 151 तालुक्यात दुष्काळ आहे.

राधामोहन सिंह यांनी घोषणेत नेमके काय सांगितले?

“केंद्र सरकारकडून दुष्काळाचा सामना करण्यासाठी कर्नाटक राज्यासाठी 949 कोटी 49 लाख रुपये, तर महाराष्ट्रासाठी 4 हजार 714 कोटी 28 लाख रुपये दिले जातील. 2018-2019 या वर्षातील दुष्काळग्रस्तांसाठी ही मदत असेल.”, असे केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी सांगितले.

केंद्र सरकारकडून मदत (राज्यनिहाय आकडेवारी) :

  • महाराष्ट्र : 4714.28 कोटी (दुष्काळ)
  • कर्नाटक : 949.49 कोटी रुपये (दुष्काळ)
  • आंध्र प्रदेश : 900.40 कोटी रुपये (दुष्काळ)
  • गुजरात : 127.60 कोटी रुपये (दुष्काळ)
  • हिमाचल प्रदेश : 317.44 कोटी रुपये (पूर आणि भूस्खलन)
  • उत्तर प्रदेश : 191.73 कोटी रुपये (पूर)
  • पद्दुचेरी : 13.09 कोटी रुपये (वादळ)

दरम्यान, 27 जानेवारी रोजीच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने पहिली मदत जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील 151 दुष्काळी तालुक्यांतील शेतकऱ्यांना 2 हजार 900 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. ही मदत शेतकऱ्यांना दोन टप्प्यांमध्ये दिली जाणार आहे. दुष्काळात जाहीर झालेली ही आजवरची सर्वात मोठी मदत आहे.

संबंधित बातम्या : 

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची पहिली मदत जाहीर

87 कोटींपैकी 50 कोटीच दुष्काळ निवारण्यासाठी वितरित, 37 कोटी अद्याप पडूनच!

ना दुष्काळी पथकाकडून पाहणी, ना भेट, शेतकरी दाम्पत्य 10 तास ताटकळत

राज्यातील दुष्काळी गावांची संख्या वाढणार?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *