दिल्लीतल्या तडजोडीत व्यस्त, चंद्राबाबूंचं मुख्यमंत्रीपदही गेलं, विधानसभेला दारुण पराभव

अमरावती : लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश विधानसभेचाही निकाल लागतोय. यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीचा दारुण पराभव होत असल्याचं चित्र आहे. सुरुवातीच्या कलांनुसार, 175 जांगांपैकी जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस 150 जागांवर पुढे आहे. लोकसभेतही टीडीपीची पिछेहाट झाली आहे. वाआयएर राज्यातील सर्वच्या सर्व जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे. चंद्राबाबू आजच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात. तर …

दिल्लीतल्या तडजोडीत व्यस्त, चंद्राबाबूंचं मुख्यमंत्रीपदही गेलं, विधानसभेला दारुण पराभव

अमरावती : लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश विधानसभेचाही निकाल लागतोय. यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीचा दारुण पराभव होत असल्याचं चित्र आहे. सुरुवातीच्या कलांनुसार, 175 जांगांपैकी जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस 150 जागांवर पुढे आहे. लोकसभेतही टीडीपीची पिछेहाट झाली आहे. वाआयएर राज्यातील सर्वच्या सर्व जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे.

चंद्राबाबू आजच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात. तर जगनमोहन रेड्डी हे 30 मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. आंध्र प्रदेश मुख्य लढत चार पक्षांमध्ये होती. राष्ट्रीय पक्षांमध्ये काँग्रेस आणि भाजप आहे, तर प्रादेशिक पक्षांमध्ये टीडीपी आणि वायएसआरचा समावेश आहे. विविध छोट्या पक्षांचाही निवडणुकीत समावेश होता.

विधानसभेतील सध्याची स्थिती काय?

175 सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत टीडीपीकडे 125 आमदार आहेत, तर वायएसआरकडे 46 जागा आहेत. भाजपने गेल्या निवडणुकीत चार जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला खातंही उघडता आलं नव्हतं.

चंद्राबाबू दिल्लीतल्या राजकारणात व्यस्त

चंद्राबाबूंच्या पक्षाचा दारुण पराभव झाला असला तरी निकालाच्या अगोदरपासूनच त्यांनी विरोधकांची मोटबांधणी सुरु केली होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सपा-बसपा, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही त्यांनी भेट घेतली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *