Chandrayan Anthem : 'इतिहास रचाएंगे, अंतरिक्ष में तिरंगा लेहराएंगे', इस्रोसाठी खास गाणं

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चा महत्त्वाकांक्षी 'चंद्रयान-2' (Chandrayan-2 mission) मोहिमेतील विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर संपूर्ण देश इस्रो आणि वैज्ञानिकांच्या समर्थनार्थ एकवटला आहे. त्यानंतर आता वैज्ञानिकांना ट्रिब्युट देण्यासाठी एक गाणंही तयार करण्यात आलं आहे. याला 'चंद्रयान अँथम' म्हटलं जात आहे.

Chandrayan Anthem : 'इतिहास रचाएंगे, अंतरिक्ष में तिरंगा लेहराएंगे', इस्रोसाठी खास गाणं

मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (इस्रो) ‘चंद्रयान-2’ (Chandrayan-2 mission) मोहिमेतील विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर संपूर्ण देश इस्रो आणि वैज्ञानिकांच्या समर्थनार्थ एकवटला आहे (Lander Vikram Found). वैज्ञानिकांच्या प्रयत्नांचं प्रत्येकजण कौतुक करत आहे. त्यानंतर आता वैज्ञानिकांना ट्रिब्युट देण्यासाठी एक गाणंही तयार करण्यात आलं आहे. याला ‘चंद्रयान अँथम’ म्हटलं जात आहे (Chandrayan Anthem).

हे गाणं ‘चंद्रयान-2’ मोहिमेसाठी काम करणाऱ्या प्रत्येक वैज्ञानिकाला डेडिकेट करण्यात आलं आहे. ‘तिरंगा लेहराएंगे’ (Tirangaa Leharayenge), असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं Sreekant’s SurFira बँडने तयार केलं आहे. या गाण्याचे शब्द प्रेरणा देणारे आणि देशभक्तीने ओतप्रोत आहेत.

या गाण्याच्या व्हिडीओमध्ये प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचीही एक झलक पाहायला मिळत आहे. जबरदस्त, प्रेरणादायी आणि देशभक्तीपर हे गाणं लोकांच्याही पसंतीस पडत आहे. इस्रोच्या ‘चंद्रयान-2’ मोहिमेवर युट्यूबवर अनेक गाणी अपलोड होत आहेत. या सर्व गाण्यांच्या माध्यमातून प्रत्येकाने इस्रोच्या या मोहिमेचं कौतुक केलं आहे आणि त्यांना प्रोत्साहन दिलं आहे.

पाहा व्हिडीओ :

चंद्राच्या पृष्ठभागाच्या 2.1 किमी अंतरावर संपर्क तुटला

शुक्रवारी (6 सप्टेंबरला) उशिरा रात्री चंद्राच्या दक्षिण ध्रुवावार सॉफ्ट लँडिंगदरम्यान विक्रम लँडर आणि इस्रोचा संपर्क तुटला. चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या 2.1 किलोमीटरच्या अंतरावर असताना विक्रम लँडर आणि इस्रोचा संपर्क तुटला. त्यानंतर चंद्राची परिक्रमा करत असलेल्या ऑर्बिटरने विक्रमचा शोध लावला आणि त्याचे थर्मल फोटोही घेतले. मात्र, अद्यापही विक्रमशी कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही.

ISRO चे वैज्ञानिक विक्रमशी संपर्क करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्ड लँडिंगनंतरही विक्रम लँडर सुरक्षित आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान पोहोचलेलं नाही. पण, याबाबत इस्रोकडून सध्या कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

संबंधित बातम्या :

Chandrayaan-2 : नासाकडून कौतुकाची थाप, इस्रोला मोठी ऑफर

‘विक्रम, लवकर उत्तर दे… पावती फाडणार नाही’

#Chandrayaan2 : भारतासाठी मोठा दिलासा! विक्रम लँडरचा शोध लागला, संपर्कासाठी प्रयत्न

Mission Chandrayan-2 : विक्रम लँडरचं चंद्रावर क्रॅश लॅडिंगची शक्यता, इस्त्रो संपर्काच्या प्रयत्नात

Mission Chandrayaan-2 : सोशल मीडियावर ‘भाई लँड करा दे’ हॅशटॅगचा पाऊस

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *