आयकर विभागाकडून पॅनकार्डच्या नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली : आयकर विभागकडून पॅन कार्डच्या नियमात नवीन बदल करण्यात आले आहेत. या नवीन बदलानुसार पॅनकार्डचा फॉर्म भरतानाच्या काही अटी शिथील केल्या आहेत. सध्या  नागरिकांना पॅनकार्ड काढण्यासाठी घटस्फोटीत आई-वडिलांचे नाव देणं अनिर्वाय आहे. मात्र, ही अट 5 डिसेंबरपासून शिथील केली जाणार आहे. त्यानंतर वडिलांचे नाव न लावताही पॅनकार्ड काढता येणार आहे. आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर …

आयकर विभागाकडून पॅनकार्डच्या नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली : आयकर विभागकडून पॅन कार्डच्या नियमात नवीन बदल करण्यात आले आहेत. या नवीन बदलानुसार पॅनकार्डचा फॉर्म भरतानाच्या काही अटी शिथील केल्या आहेत. सध्या  नागरिकांना पॅनकार्ड काढण्यासाठी घटस्फोटीत आई-वडिलांचे नाव देणं अनिर्वाय आहे. मात्र, ही अट 5 डिसेंबरपासून शिथील केली जाणार आहे. त्यानंतर वडिलांचे नाव न लावताही पॅनकार्ड काढता येणार आहे.

आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर नागरिकांना नवीन पॅनकार्ड काढण्यासाठी वडिलांचे नाव लावणं गरजेचं होतं. त्यामुळे अनेकांना असंख्य अडचणींना सामोरं जावं लागतं. परिणामी अनेक जण पॅनकार्ड काढण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आयकर विभागाला मोठा तोटा सहन करावा लागत होता. त्यामुळे आयकर विभागाने हा निर्णय घेतला आहे.

आयकर विभागाचा नवीन नियम येत्या 5 डिसेंबरपासून लागू होईल. या अधिसूचनेनुसार एका वर्षात 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना आयकर भरणे अनिर्वाय आहे. पॅनकार्डधारकांनी 31 मे पर्यंत आयकर भरणे आवश्यक आहे

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *