तुमचं SBI मध्ये खातं आहे ?, 1 जुलैपासून SBI च्या नियमात बदल

तुम्ही जर 'स्टेट बँक ऑफ इंडिया'चे (SBI) ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. SBI बँक 1 जुलै पासून आपल्या नियमांमध्ये बदल करुन नवीन नियमांची घोषणा करणार आहे.

तुमचं SBI मध्ये खातं आहे ?, 1 जुलैपासून SBI च्या नियमात बदल

मुंबई : तुम्ही जर ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे (SBI) ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. SBI बँक 1 जुलै पासून आपल्या नियमांमध्ये बदल करुन नवीन नियमांची घोषणा करणार आहे. या नवीन नियमांचा थेट  SBI च्या 42 कोटी ग्राहकांवर परिणाम पडणार आहे.

SBI कडून 1 जूलैपासून रेपो रेटला जोडलेले गृह कर्ज ग्राहकांना ऑफर करण्यात येणार आहेत. यापुढे SBI चा होम लोनचा व्याजदर पूर्णपणे रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटवर आधारित असेल. रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटमध्ये बदल झाल्यास त्याचा थेट परिणाम SBI च्या होम लोन व्याज दरावर होणार आहे. SBI च्या व्याज दरात घट झाली, तर याचा फायदा ग्राहकांना मोठ्या प्रमाणात होईल.

रिझर्व्ह बँक जेव्हा रेपो रेटमध्ये बदल करेल, तेव्हा SBI च्या होम लोनच्या व्याज दरात चढ – उतार होईल. कारण आता यापुढे SBI बँक रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटनुसार आपल्या व्याज दारत चढ – उतार करणार आहे. SBI च्या नव्या नियमांमुळे 42 कोटी ग्राहाकांना व्याज दरात घट झाल्यास होम लोनसाठी सोयीस्कर पडू शकते.

गेल्या गुरुवारी रिझर्व्ह बँकेने सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची घट करत 5.75 वर आणला होता. रिझर्व्ह बँकेने गेल्या 6 महिन्यात सलग तीन वेळा रेपो रेटमध्ये घट केली. डिसेंबर ते जून च्या दरम्यान रेपो रेटमध्ये एकूण 0.75 टक्के घट केली. यामुळे भविष्यात SBI चे होम लोनही कमी होऊ शकते. सध्या रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये काही बदल केले नसल्याने SBI होम लोन स्थिर आहे.

रिझर्व्ह बँकेद्वारे वर्षात 6 वेळा म्हणजे प्रत्येक दुसऱ्या महिन्यात रेपो रेटमध्ये बदलाव करते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *