गार्बेज कॅफे : 1 किलो प्लास्टिक द्या, फुकटात जेवा, प्लास्टिक मुक्तीसाठी महापौरांची आयडिया

अम्बिकापूर नगर पालिका ‘गार्बेज कॅफे’ योजना सुरु करणार आहे. या कॅफेमध्ये मोफत जेवण आणि नाश्ता मिळेल. त्या मोबदल्यात तुम्हाला पैसे नाही, तर पिशव्या जमा करुन द्यायच्या आहेत.

'Garbage Cafe' to provide food in exchange of plastic waste, गार्बेज कॅफे : 1 किलो प्लास्टिक द्या, फुकटात जेवा, प्लास्टिक मुक्तीसाठी महापौरांची आयडिया

रायपूर : गरिबांना पोटभर जेवण मिळावं, त्यासोबतच शहर स्वच्छ राहावं यासाठी छत्तीसगडच्या सरगुजा जिल्ह्यात एक स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. येथील अम्बिकापूर नगर पालिकेने शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एक अनेखी शक्कल लढवली आहे. यामुळे भुकेल्यांना पोटभर जेवण मिळणार आहे. त्यासाठी फक्त प्लास्टिकच्या पिशव्या जमा करायच्या आहेत. याच पिशव्यांच्या मोबदल्यात नगर पालिका पोटभर जेवण देईल.

अम्बिकापूर नगर पालिका ‘गार्बेज कॅफे’ योजना सुरु करणार आहे. या कॅफेमध्ये मोफत जेवण आणि नाश्ता मिळेल. त्या मोबदल्यात तुम्हाला पैसे नाही, तर पिशव्या जमा करुन द्यायच्या आहेत.

पिशव्यांच्या मोबदल्यात रोज नाश्ता आणि जेवण

अम्बिकापूर नगर पालिकेच्या ‘गार्बेज कॅफे’ या नव्या योजनेअंतर्गत जेवणासाठी तुम्हाला श्रमदान करावं लागणार आहे. यासाठी रस्त्यांवर फेकण्यात आलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या या कॅफेमध्ये आणून जमा करायच्या आहेत. एक किलो प्लास्टिक पिशव्यांच्या मोबदल्यात पोटभर जेवण, तर अर्धा किलो प्लास्टिकच्या पिशव्यांच्या मोबदल्यात पोटभर नाश्ता मिळेल, अशी माहिती महापौर अजय तिरके यांनी दिली.

स्वच्छता, सेवा आणि आत्मसम्मान

या कॅफेला शहराच्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सेंटरमध्येच चालवण्यात येईल. नगर पालिकेने हा प्रस्ताव पारित केला आहे. लवकरच यावर अंबलबजावणी केली जाईल. या योजनेत स्वच्छता आणि सेवा यासोबतच आत्मसम्मानाकडेही खास लक्ष देण्यात आलं आहे. प्लास्टिकच्या पिशव्या जमा केल्याने एकीकडे शहर आणखी स्वच्छ होईल, सुंदर होईल. तर दुसरीकडे, गरीब लोकांना त्यांचं पोट भरण्याचा एक नवा मार्ग मिळेल. यामुळे त्यांना त्यांच्या आत्मसम्मानाला ठेच लागणार नाही. ते फुटकात मिळालेलं जेवण नाही, तर प्लास्टिकच्या पिशव्या जमा करुन त्याच्या मोबदल्यात मिळालेल्या जेवणाचा आनंद घेऊ शकतील. अम्बिकापूर नगर पालिकेची ही ‘गार्बेज कॅफे’ योजना खरंच कौतुकास्पद आहे.

संबंधित बातम्या :

करदात्यांसाठी खूशखबर! इनकम टॅक्स रिटर्न भरण्याच्या मुदतीत वाढ

गेम टास्कसाठी तरुणी घरातून बाहेर पडली, 18 दिवसात 10 शहरं फिरली

प्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 टक्के भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे

खात्यातून पैसे कट झाले, पण हातात मिळाले नाही, सर्वात अगोदर ‘हे’ काम करा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *