सीएएफच्या तीन जवानांचा एकमेकांवर गोळीबार, एकाचा मृत्यू

छत्तीसगड सशस्त्र दलाच्या (CAF) तीन जवानांनी एकमेकांवर गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये घडला. या गोळीबारात एका जवानाचा मृत्यू झाला आहे.

सीएएफच्या तीन जवानांचा एकमेकांवर गोळीबार, एकाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 02, 2020 | 9:39 AM

रायपूर : छत्तीसगड सशस्त्र दलाच्या (CAF) तीन जवानांनी एकमेकांवर गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये घडला. या गोळीबारात एका जवानाचा मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. जखमी जवानांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे (CAF Personnel Open Firing).

माहितीनुसार, बीजापूरच्या फरेसगड येथील सीएएफच्या छावणीत तीन जवानांनी एकमेकांवर गोळीबार केला. जवान दयाशंकर शुक्ला, रविरंजन आणि मोहम्मद शरीफ यांनी एकमेकांवर गोळीबार केला. गोळीबारात तीनही जवान गंभीर जखमी झाले होते. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान जवान रविरंजन यांचा मृत्यू झाला. तर दोन जवनांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

या जवानांमध्ये कुठल्या मुद्यावरुन वाद झाला आणि त्यांनी एकमेकांवर गोळीबार का केला, याबाबत सध्या कुठलीही माहिती नाही. या जवानांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत तपास सुरु असल्याची माहिती पोलिस महानिरीक्षकांनी दिली.

आपआपसांतील गोळीबारात दरवर्षी 100 जवानांचा मृत्यू

रिपोर्टनुसार, दरवर्षी केंद्रीय सशस्त्र दलाच्या सरासरी 100 जवानांचा आपआपसांतील भांडणात मृत्यू होतो. तर दरवर्षी जवळपास 66 जवान कर्तव्यावर असताना शहीद होतात.

गेल्यावर्षीही डिसेंबर महिन्यात छत्तीसगडच्या बस्तरमध्ये आयटीबीपीच्या कडनेर येथील 45 व्या बटालियनच्या छावणीतील जवानांनी एकमेकांवर गोळीबार केला होता. यामध्ये सहा जवानांचा मृत्यू झाला होता, तर दोन जवान जखमी झाले होते.

आकड्यांनुसार, 2016 ते 2018 मध्ये दरवर्षी केंद्रीय सशस्त्र दलाच्या सरासरी 100 जवानांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये काही जवानांचा आपआपसांतील गोळीबारात मृत्यू झाला, तर काहींनी आत्महत्या केली. यामागे, तणाव हे एक महत्त्वाचं कारण असल्याचं सांगितलं जातं. दुसरीकडे, दरवर्षी जवळपास 66 जवान कर्तव्यावर असताना शहीद होतात.

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.