चीनच्या गुप्तहेरी करणाऱ्या जाहाजाला श्रीलंकेत येण्याची मंजुरी, भारतीय नौदल आणि इस्रोला धोका

यापूर्वी हे जहाज ११ ऑगस्टला हंबनटोटा बंदरात पोहचेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या गुप्तहेरी करु शकणाऱ्या जहाजावरुन भारताने श्रीलंकेकडे विरोध प्रदर्शित केला होता. भारताच्या विरोधानंतरही श्रीलंकेने या जहाजाला हंबनटोटामध्ये येण्याची परवानगी दिलेली आहे. या जहाजाच्या हालचालींवर भारतीय नौदलाची करडी नजर आहे.

चीनच्या गुप्तहेरी करणाऱ्या जाहाजाला श्रीलंकेत येण्याची मंजुरी, भारतीय नौदल आणि इस्रोला धोका
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 11:28 PM

नवी दिल्ली : भारताच्या विरोधामुळे श्रीलंकेच्या( Sri Lanka) हंबनटोटा बंदरावर जाऊ न शकलेले चीनचे गुप्तहेरी(Chinese spy ship) करणारे जहाज आता तिथे जाणार आहे, इतकेच नाही तर तिथे हे जहाज सहा दिवस मुक्कामही करणार आहे. युआन वांग-५ नावाच्या या जहाजापासून भारतीय नौदल आणि इस्रोला गुप्तहेरीचा धोका वाढल्याचे मानण्यात येत आहे. चीनचे हे जहाज ७५० किमी लांबीपर्यंत सहजपणे लक्ष ठेवू शकते. हंबनटोटावरुन तामिळनाडूच्या कन्याकुमारीचे अंतर केवळ ४५१ किमी आहे. गुप्तहेरी होण्याच्या धोक्यामुळेच भारताने श्रीलंकेला या जहाजाला प्रवेश दऊ नका, असे सांगितले होते.

१६ ते २२ ऑगस्ट जहाज राहणार श्रीलंकेच्या बंदरावर

श्रीलंकेतील बंदरांचे प्रमुख निर्मल पी सिल्वा यांनी सांगितले आहे की, १६ ते २२ ऑगस्टपर्यंत हंबनटोटात जहाजाला मुक्कामासाठी परराष्ट्र मंत्रालयाने मंजुरी दिलेली आहे. ज्यावेळी श्रीलंकेत सरकारविरोधात बंड होत होते, जनता रस्त्यावर होती, त्यावेळी पुन्हा नव्याने ही परवानगी देण्यात आली असल्याची परराष्ट्र मंत्रालयाची माहिती आहे. यानंतरच श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे देश सोडून पळून गेले.

चिनी जहाज सॅटेलाईट ट्रॅकिंगमध्येही वाकबगार

चिनी गुप्रहेरी करणारे जहाज युआन वांग-५ ने अंतराळ आणि सॅटेलाईट ट्रँकिंगमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे. चीन या जहाजाच्या मदतीने सॅटेलाईट, रॉकेट आणि इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईलच्या लाँचिंगवर लक्ष ठेवू शकते, त्याचा ट्रॅक ठेवू शकते. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या एका अहवालानुसार, या जहाजाला चिनी सैन्याला स्टॅटजिक सपोर्ट करणारी एसएसएफकडून नियंत्रित केले जाते. एसएसएफ ही थिएटर कमांड लेव्हलची संघटना आहे. ही चिनी सैन्याला अंतराळ, सायबर, इलेक्रॉनिक, माहिती, कम्युनिकेशन, सायकॉलॉजिकल वॉरफेअर मिशनमध्ये मदत करीत असते. यापूर्वी चीनने २०२२ मध्येच लाँग मार्च पाईव्ह बी रॉकेट लाँच केले होते. त्यावेळी हे जहाज परिसरात लक्ष ठेवण्यासाठी बाहेर काढण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या चीनच्या तियांगोंग अंतराळ स्थानकातील पहिल्या लॅब मॉड्यूलच्या लाँचिंगच्या वेळीही समुद्रात निरीक्षण ठेवण्यासाठी या जहाजाचा उपयोग करण्यात आला होता.

११ ऑगस्टला हंबनटोटा पोहचण्याची शक्यता होती

यापूर्वी हे जहाज ११ ऑगस्टला हंबनटोटा बंदरात पोहचेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या गुप्तहेरी करु शकणाऱ्या जहाजावरुन भारताने श्रीलंकेकडे विरोध प्रदर्शित केला होता. भारताच्या विरोधानंतरही श्रीलंकेने या जहाजाला हंबनटोटामध्ये येण्याची परवानगी दिलेली आहे. या जहाजाच्या हालचालींवर भारतीय नौदलाची करडी नजर आहे.

भारताचे नौदल तळ हे चीनच्या रडारवर येणार

युआन वांग-५ हे लष्करी नव्हे तर ट्रॅकिंग करणारे पॉवरफुल जहाज आहे. चीन तकिंवा इतर कोणता देश एखादे मोठे क्षेपणास्त्र परीक्षण करीत असेल तेव्हा या जहाजाची साधारण हाचलाल होते. ७५० किमी अंतरावर काय सुरु आहे, याची गुप्त माहिती हे जहाज सहज मिळवू शकते. ४०० क्रू मेंबर्स असलेले हे जहाज पॅरोबोलिक ट्रँकिंग अँटिना आणि अनेक सेन्सर्सनी भरलेले आहे. हंबनटोटात पोहचल्यानंतर या जहाजाच्या कक्षेत भारताची प्रमुख सैन्य आणि अण्वस्त्र कार्यक्रमांची ठिकाणे येणार आहेत. यात कलपक्कम आणि कुडनकुलम यांचा समावेश आहे. याच बरोबर केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील अनेक बंदरेही चीनच्या रडारवर असणार आहेत. भारताच्या नौदलाची आणि अण्वस्त्रांची गुप्त माहिती काढण्यासाठीच हे जहाज श्रीलंकेत पाठवले जात असल्याचे काही संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

इस्रोला गुप्तहेरीचा धोका

या जहाजात लपून ऐकण्याची उपकरणे आहेत. त्यांना हायटेक इव्हड्रॉपिंग इक्विपमेंट असे म्हणतात. म्हणजेच श्रीलंकेच्या तटावर राहूनही या जहाजातून भारतातील अंतर्गत माहिती मिळवता येणे सहज शक्य आहे. पूर्व तटालर असलेल्या भारताच्या नौदलाच्या तळावरही या जहाजाचे लक्ष असेल. चांदीपूरमध्ये असलेल्या इसरोच्या लाँचिंग केंद्राचीही गुप्तहेरी या जहाजाच्या माध्यमातून करण्यात येऊ शकते. तसेच अग्नी सारख्या क्षेपणास्त्रांची सर्व माहिती, कामगिरी आणि रेंज ही चोरीला जाण्याची शक्यता आहे. देशाच्या सुरक्षेसाठी आणि आर्थिक बाबी लक्षात घेता या सगळ्यावर भारताची नजर आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.