कोरोनाशी मुकाबल्यासाठी सशस्त्र दलांकडून ‘को-जीत’ मोहीम, मराठमोळ्या माधुरी कानिटकरांकडे नेतृत्व

उपचाराबरोबरच रुग्णांना बरे वाटेल याची खात्री केली पाहिजे आणि कठीण परिस्थितीत जर तुमच्याजवळ कोणी बोलणारा असेल तर खूप मदत होते, असंही त्यांनी अधोरेखित केलंय. Lt. Gen. Madhuri Kanitkar

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:51 PM, 3 May 2021
कोरोनाशी मुकाबल्यासाठी सशस्त्र दलांकडून 'को-जीत' मोहीम, मराठमोळ्या माधुरी कानिटकरांकडे नेतृत्व
Lt. Gen. Madhuri Kanitkar

नवी दिल्ली: कोरोनाच्या संकटामुळे देशात अभूतपूर्व अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्य गोरगरिबांच्या मदतीसाठी सशस्त्र दलही पुढे सरसावलंय. वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि ऑक्सिजन पुरवठा मजबूत करण्याबरोबरच लोकांचे मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी सशस्त्र दलानं ‘को-जीत’ नावाची मोहीम सुरू केलीय. ‘इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ’ (Medical) च्या उपप्रमुख लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (Lt. Gen. Madhuri Kanitkar) यांच्याकडे या मोहिमेची धुरा सोपवण्यात आलीय. उपचाराबरोबरच रुग्णांना बरे वाटेल याची खात्री केली पाहिजे आणि कठीण परिस्थितीत जर तुमच्याजवळ कोणी बोलणारा असेल तर खूप मदत होते, असंही त्यांनी अधोरेखित केलंय. (CO-JEET launched by armed forces to fight COVID-19 in India says Lt. Gen. Madhuri Kanitkar)

कानिटकर ‘थ्री स्टार जनरल’ बनणाऱ्या सशस्त्र सैन्यातली तिसऱ्या महिला

लेफ्टनंट जनरल कानिटकर या ‘थ्री स्टार जनरल’ बनणाऱ्या सशस्त्र सैन्यातली तिसऱ्या महिला आहेत. कोविड 19 च्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी त्यांनी आखलेली रणनीती प्रत्यक्षात साकारण्यासाठी आणि त्यांचे परीक्षण करण्यासाठी त्या 24 तास कार्यरत आहेत. त्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितलंय. “को-जीत मोहिमेत सैन्य, भारतीय वायुसेना आणि नौदल या तीन सशस्त्र दलांच्या जवानांच्या सहकार्यानं ऑक्सिजन निर्मितीसह पुरवठा करण्याबरोबरच कोविड बेड उपलब्ध करून देणे आणि साथीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करण्यासारख्या कामांचा समावेश आहे.”

सशस्त्र दलाच्या जवानांची टीम 24 तास कार्यरत

भारत कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेचा सामना करत आहे. आणि बर्‍याच राज्यांमधील रुग्णालयांमध्ये औषधे, ऑक्सिजन आणि बेड्सची कमतरता भासतेय. वरिष्ठ अधिकारी म्हणाल्या की, देशातील इतर आरोग्य कर्मचार्‍यांप्रमाणेच सशस्त्र दलाच्या जवानांची टीम 24 तास कार्यरत आहे. “या कोविड संकटात अनेक माजी सैनिकही सैन्य रुग्णालयात येत आहेत. दिल्ली आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये आमच्याकडे फक्त संरक्षण आणि माजी सैन्य दलासाठी 400 ते 500 रुग्णालये आहेत. ”

ही निःसंशयपणे युद्धसदृश परिस्थिती

कोरोना व्यवस्थापनासाठी देशभरात अतिरिक्त बेड उपलब्ध करून देण्याचेही प्रयत्न सुरू आहे, असंही कानिटकरांनी सांगितलंय. ‘को-जीत’ मोहिमेबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, “ही निःसंशयपणे युद्धसदृश परिस्थिती आहे आणि त्याला देशातील प्रत्येक घटक तोंड देत आहे. या साथीच्या आजाराचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसलाय. कानिटकर यांचे पतीसुद्धा लेफ्टनंट जनरल पदावरून सैन्यातून सेवानिवृत्त झालेत आणि या पदापर्यंत पोहोचणारे ते एकमेव जोडपे आहे. कानिटकर म्हणाल्या की, संरक्षण विभागाने कोविड 19 संकट व्यवस्थापन समितीची स्थापना केलीय आणि आम्ही एकत्रितपणे युद्धपातळीवर काम करीत आहोत.

एखाद्या सैनिकाला प्रतिकूल परिस्थितीत लढण्याचे प्रशिक्षण दिले जाते

लेफ्टनंट जनरल म्हणाल्या, “को-जीतमध्ये ‘को’ चा अर्थ तीन सैन्याच्या सहकाऱ्यांशी संबंधित आहे, जे शेवटी कोविडवर ‘जीत’ (विजय) मिळवतील.” एक संपूर्ण टीम अत्यंत सक्रिय मार्गाने कार्य करतेय, कारण एखाद्या सैनिकाला प्रतिकूल परिस्थितीत लढण्याचे प्रशिक्षण दिले जाते आणि तो कधीच हार मानत नाही, आम्ही फक्त डॉक्टरच नाही तर सैनिकही आहोत, ” असंही त्या म्हणाल्यात. लेफ्टनंट जनरल ऑक्सिजनच्या कमतरतेवर म्हणाल्या, “काही सैन्य रुग्णालयांचे स्वतःचे ऑक्सिजन उत्पादन प्लांट आहेत. परंतु सद्यस्थितीत हे सिद्ध झाले आहे की, आम्हाला ही सुविधा आणखी बळकट करण्याची आवश्यकता आहे. विविध ठिकाणी सुमारे 46 ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प उभारले जात आहेत. तसेच त्यांनी सैन्य दलाच्या तीन सैन्याच्या प्रयत्नही अधोरेखित केलेत.

संबंधित बातम्या

कोरोनाच्या सौम्य लक्षणांमध्ये सतत CT Scan करु नका, अन्यथा कॅन्सरचा धोका : AIIMS

NEET PG Exam Postponed: नीट पीजी परीक्षा 4 महिन्यांसाठी लांबणीवर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

CO-JEET launched by armed forces to fight COVID-19 in India says Lt. Gen. Madhuri Kanitkar