दलाल, हिटलर, मौत का सौदागर.. प्रेमाचा मुखवटा घालून काँग्रेसच्या शिव्या : मोदी

कुरुक्षेत्र, हरियाणा : महाभारताची भूमी कुरुक्षेत्रमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. प्रियांका गांधींनी मोदींना दुर्योधन संबोधलं होतं. काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते प्रेमाचा मुखवटा घालून मला शिव्या देतात. या नेत्यांनी मला रावण, साप, विंचू, वाईट व्यक्ती, विष पेरणारा, मौत का सौदागर, हिटलर, मुसोलिनी […]

दलाल, हिटलर, मौत का सौदागर.. प्रेमाचा मुखवटा घालून काँग्रेसच्या शिव्या : मोदी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM

कुरुक्षेत्र, हरियाणा : महाभारताची भूमी कुरुक्षेत्रमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. प्रियांका गांधींनी मोदींना दुर्योधन संबोधलं होतं. काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते प्रेमाचा मुखवटा घालून मला शिव्या देतात. या नेत्यांनी मला रावण, साप, विंचू, वाईट व्यक्ती, विष पेरणारा, मौत का सौदागर, हिटलर, मुसोलिनी अशा शिव्या दिल्या. एवढंच नाही, तर माझ्या आईला शिव्या देत माझे वडील कोण अशीही विचारणा केली. पंतप्रधान झाल्यानंतर या सर्व शिव्या मला देण्यात आल्या, असं मोदी म्हणाले.

हरियाणामध्ये मोदींनी विविध ठिकाणी सभा घेतल्या. कुरुक्षेत्रमध्येही त्यांनी भाजपच्या उमेदवारासाठी प्रचार केला. यावेळी काँग्रेसच्या वक्तव्यांचाही समाचार घेतला. मी काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांना मनमानी करु देत नाही, त्यांचा भ्रष्टाचार रोखतो, घराणेशाहीवर बोलतो म्हणून हे लोक वारंवार प्रेमाचा मुखवटा घालून मला शिव्या देतात. यांनी भारतीय संस्कृती बदनाम करण्याची मोहिम हाती घेतली आहे, असा घणाघात मोदींनी केला.

तुम्ही कितीही द्वेष करा, आमच्याकडून फक्त प्रेमच येईल, असं राहुल गांधी नेहमी म्हणत असतात. त्यावरही मोदींनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. मी पंतप्रधान झाल्यानंतर लोकांनी माझ्यावर कसा प्रेमवर्षाव केलाय… मला मोस्ट स्टुपिड पंतप्रधान संबोधलं, जवानांच्या रक्ताचा दलाल म्हटलं गेलं, मुसोलिनी, हिटलर अशी नावं देण्यात आली. यांच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी मला मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं सांगितलं. माझे वडील कोण, आजोबा कोण हे देखील विचारलं गेलं, हे सर्व प्रेम मला पंतप्रधान झाल्यापासून आजपर्यंत मिळत आहे, असं मोदी म्हणाले.

देश स्वातंत्र्य झाल्यापासून भारतीय शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी आजपर्यंत पाकिस्तानला दिलं गेलं. पण आजपर्यंत काँग्रेसने यावर चकार शब्द काढला नाही. या चौकीदाराने देशाच्या हक्काचं पाणी आपल्या शेतकऱ्यांना देण्याचा संकल्प केलाय. भारताच्या हक्काचा थेंब ना थेब शेतकऱ्यांना दिला जाईल. काँग्रेस केवळ एकाच कुटुंबाच्या चिंतेत बुडालेली असते. यामुळेच भारतीयांच्या हिताचं संरक्षण करताना कधीही गांभीर्यता दिसली नाही, असा घणाघात मोदींनी केला.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.