शशी थरुर तराजूतून पडले, डोक्याला सहा टाके!

तिरुअनंतपुरम (केरळ) : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि तिरुअनंतपुरमचे काँग्रेस उमेदवार शशी थरुर हे मंदिरात पूजेदरम्यान तुला करताना पडले. त्यांना तातडीने जवळील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या दुर्घटनेत शशी थरुर यांच्या डोक्याला दुखापत झाली असून, जखम झालेल्या ठिकाणी 6 टाके पडले आहेत. तिरुअनंतपुरम येथील मंदिरात तुलाभराम पूजा करत असताना, या पूजेच्या विधीचा एक भाग म्हणून …

शशी थरुर तराजूतून पडले, डोक्याला सहा टाके!

तिरुअनंतपुरम (केरळ) : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि तिरुअनंतपुरमचे काँग्रेस उमेदवार शशी थरुर हे मंदिरात पूजेदरम्यान तुला करताना पडले. त्यांना तातडीने जवळील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या दुर्घटनेत शशी थरुर यांच्या डोक्याला दुखापत झाली असून, जखम झालेल्या ठिकाणी 6 टाके पडले आहेत.

तिरुअनंतपुरम येथील मंदिरात तुलाभराम पूजा करत असताना, या पूजेच्या विधीचा एक भाग म्हणून ते फळ आणि मिठाईंच्या तराजूत तुला करत होते. त्यावेळी ते पडले आणि त्यात त्यांच्या डोक्याला मार लागला.

तुलाभरम पूजा केरळमधील मोजक्याच मंदिरात केली जाते. वजनाइतकी मिठाई किंवा फळं या देवाला अर्पण केली जातात. त्यामुळे ज्या मंदिरात तुलाभरम पूजा केली जाते, त्या मंदिरांच्या बाहेर मोठमोठे तराजू ठेवलेले पाहायला मिळतात.

शशी थरुर हे माजी केंद्रीय मंत्री असून, केरळमधील तिरुअनंतपुरम येथून काँग्रेसचे खासदार आहेत. शिवाय, यंदाही ते याच लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात राजशेखरन रिंगणात आहेत. राजशेखरन यांनी नुकतेच मिझोरमच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. शशी थरुर सलग दोनवेळा तिरुअनंतपुरम येथून खासदार आहेत. त्यामुळे यंदा शशी थरुर हॅटट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत.

केरळमध्ये एकाच टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. 23 एप्रिल रोजी केरळमध्ये मतदान पार पडणार असून, 23 मे रोजी सर्व निकालांसोबतच निकाल लागणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *