पत्नीसोबत बेडरुममधील काँग्रेस आमदाराचा टिक टॉक व्हिडीओ व्हायरल

बिहारचे काँग्रेस आमदार बंटी चौधरी (Congress MLA Bunty Chodhary) यांचा एक टिक-टॉक (Tik-Tok) व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पत्नीसोबत बेडरुममधील काँग्रेस आमदाराचा टिक टॉक व्हिडीओ व्हायरल

पाटणा : बिहारचे काँग्रेस आमदार बंटी चौधरी (Congress MLA Bunty Chodhary) यांचा एक टिक-टॉक (Tik-Tok) व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आमदार बंटी चौधरी आणि त्यांच्या पत्नीचा बेडरुममधील वैयक्तिक व्हिडीओ असल्याने मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. त्यामुळे बंटी चौधरी यांची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

जमुईच्या सिकंदरा येथून काँग्रेसचे आमदार सुधीर कुमार उर्फ बंटी चौधरी यांनी या घटनेची तक्रार पोलिसांकडे दाखल केली आहे. “हा व्हिडीओ आम्ही आमच्या बेडरुममध्ये बनवत होतो. पण विरोधकांनी माझ्या पत्नीचा मोबाईल हॅक करुन हा व्हिडीओ व्हायरल केला आहे”, असा आरोप त्यांनी केला आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे व्हायरल करणाऱ्यां विरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार बंटी चौधरी यांनी केली आहे. एसपी यांना तक्रार देताना सर्व घटना त्यांनी पोलिसांना सांगितली.

“माझ्या विरोधात षडयंत्र आहे. या माध्यमातून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधकांनी हे कृत्य केलं आहे”, असा आरोप त्यांनी केला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे सध्या बिहारमध्ये आमदार बंटी चौधरी यांची जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आमदार आणि त्यांची पत्नी दिसत आहे. हे दोघंही टिक टॉकवरील एका गाण्यावर आपला व्हिडीओ तयार करत होते.

व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *