VIDEO : फोटोग्राफरचा पाय घसरला, राहुल गांधी धावत मदतीला गेले!

मुंबई : फोटोग्राफर पाय घसरुन कोसळल्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी मदतीसाठी धावत पुढे गेले आणि फोटोग्राफरला मदतीचा हात दिला. राहुल गांधींमधील माणुसकीचं आणि संवेदनशीलतेचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. ओदिशातील भुवनेश्वर विमानतळावर हा प्रसंग घडला. एएनआय या वृत्तसंस्थेच्या कॅमेऱ्यात हा प्रसंग कैद झाला. राहुल गांधींच्या सतर्कतेचा हा व्हिडीओ एएनआयने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर, राहुल …

VIDEO : फोटोग्राफरचा पाय घसरला, राहुल गांधी धावत मदतीला गेले!

मुंबई : फोटोग्राफर पाय घसरुन कोसळल्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी मदतीसाठी धावत पुढे गेले आणि फोटोग्राफरला मदतीचा हात दिला. राहुल गांधींमधील माणुसकीचं आणि संवेदनशीलतेचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. ओदिशातील भुवनेश्वर विमानतळावर हा प्रसंग घडला.

एएनआय या वृत्तसंस्थेच्या कॅमेऱ्यात हा प्रसंग कैद झाला. राहुल गांधींच्या सतर्कतेचा हा व्हिडीओ एएनआयने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर, राहुल गांधींवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. राजकीय पक्षाचा मोठा नेता असताना, आजूबाजूला सुरक्षारक्षकांचं कवच असतानाही, ते सर्व न बाजूला ठेवत, राहुल गांधींनी स्वत: धावत जाऊन फोटोग्राफरला मदतीचा हात दिला

राहुल गांधी हे आज ओदिशा दौऱ्यावर आहेत. भुवनेश्वरमधील जनतेशी, विविध क्षेत्रातील मान्यवरांशी आणि पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी राहुल गांधी संवाद साधत आहेत. ‘द ओदिशा डायलॉग’ नावाचा ते कार्यक्रम घेत आहेत. लोकांच्या भावना काय, त्यांच्या मागण्या काय आणि त्यावर काँग्रेस पक्षाची भूमिका काय, असं एकंदरीत या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. यासह इतर कार्यक्रमांसाठी राहुल गांधी ओदिशात आहेत.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *