Breaking news | काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांना कोरोनाची लागण झालीयं. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी यासंदर्भात माहिती दिलीयं

Breaking news | काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Aug 13, 2022 | 1:17 PM

मुंबई : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांना कोरोनाची लागण झालीयं. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी यासंदर्भात माहिती दिलीयं. जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील पोस्ट शेअर केलीयं. आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची कोविड-19 (Corona) चाचणी पॉझिटिव्ह आली असून, सरकारने जारी केलेल्या प्रोटोकॉलनुसार त्या आयसोलेशनमध्ये आहेत, असे जयराम रमेश यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तीन दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांची मुलगी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

इथे पाहा जयराम रमेश यांची सोशल मिडिया पोस्ट

सोनिया गांधी प्रोटोकॉलनुसार आयसोलेशनमध्ये

दिल्लीमध्ये कोरोनाच्या रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसते आहे. आता सोनिया गांधी यांना दुसऱ्यांना कोरोनाची लागण झालीयं. सध्या सोनिया गांधी या घरीच होणार उपचार घेत असून त्यांची तब्येत स्थिर आल्याची देखील माहिती मिळतंय. जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील पोस्ट शेअर केलीयं. तीन दिवसांंपूर्वीच प्रियांका गांधी यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.

लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमारही कोरोना पॉझिटिव्ह

लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून सांगितले की, मी काल रात्री पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह झाले आहे. खबरदारी म्हणून मी या काळात होम क्वारंटाईनमध्ये राहीन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी COVID-19 प्रोटोकॉलचे पालन करून चाचण्या करून घ्याव्यात, असे आपल्या पोस्टमध्ये मीरा कुमार यांनी लिहिले होते.

हे सुद्धा वाचा

देशात कोरोनाने पुन्हा डाेकेवर काढले…

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसते आहे. दिल्लीमध्ये कोरोनाच्या रूग्णसंख्येचा येणारा आकडा तर धडकी भरवणाराच आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोनाने जगभरात हाहा:कार केला होता. आता कुठे काही महिन्यांपूर्वी कोरोनाची रूग्णसंख्या कमी झाल्याने कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले होते. आता राज्यात देखील कोरोनाचे कोणतेच निर्बंध नाहीयंत. मात्र, लोकांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरणे आवश्यक आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें