काँग्रेस प्रवक्त्याकडून मोदींना मसूद आणि ओसामाची उपमा, प्रेक्षकांकडूनही 'शेम शेम'चे नारे

काँग्रेस प्रवक्त्याकडून मोदींना मसूद आणि ओसामाची उपमा, प्रेक्षकांकडूनही 'शेम शेम'चे नारे

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहशतवादी मसूद अजहर, ओसामा बिन लादेन, कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयची उपमा देण्यात आली. विशेष म्हणजे ज्या कार्यक्रमात पवन खेरांनी ही उपमा दिली, त्यानंतर उपस्थित प्रेक्षकांनीही पवन खेरांविरोधात ‘शेम, शेम’ नारेबाजी केली.

पवन खेरा आणि भाजपचे प्रवक्त संबित पात्रा एका कार्यक्रमात उपस्थित होते. यामध्ये पवन खेरा यांनी MODI या नावाचा उल्लेख एम म्हणजे मसूद अजहर, ओ म्हणजे ओसामा बिन लादेन, डी म्हणजे दाऊद इब्राहिम आणि आय म्हणजे आयएसआय असा केला. यानंतर संबित पात्रा आक्रमक झाले. शिवाय उपस्थित प्रेक्षकांनीही संताप व्यक्त केला.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *