कोरोना जिहाद, भुलीचं इंजेक्शन देऊन RSS नेते टार्गेट, ISISचं धडकी भरवणारं प्लॅनिंग

त्या आरोपपत्रात कोरोना जिहादच्या माध्यमातून सादिया आणि डॉ. इश्फाक हे अटकेतील दहशतवादी देशात दहशत निर्माण करण्याचा कट रचत होते.

कोरोना जिहाद, भुलीचं इंजेक्शन देऊन RSS नेते टार्गेट, ISISचं धडकी भरवणारं प्लॅनिंग

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIAने इसिस या दहशतवादी संघटनेच्या अत्यंत थरारक कटाची माहिती उघड केली आहे. कोरोना जिहादच्या नावे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना टार्गेट करणं आणि त्यांना भुलीचं इंजेक्शन देऊन घातपात करण्याचा ISISचा डाव होता. ही खळबळजनक माहिती NIAने स्थानिक कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात दिली आहे. या माहितीमुळे इसिस ही दहशतवादी संघटना कोणत्या टोकाचा घातपात करू शकते, याचा अंदाजही आपण लावू शकत नाही.(anaesthesia injection to target rss leaders in discussions of IS members)

इस्लामिक स्टेट खोरासन प्रांत (ISKP) च्या अटक केलेल्या पाच दहशतवाद्यांकडे एनआयएने (NIA) तपास केला असता, ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. NIAनं आपल्या आरोपपत्रात या सर्व माहितीचा समावेश केला आहे. हे पाच दहशतवादी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) आडून भारत सरकारविरोधात मुस्लिमांना भडकावण्याचा कट रचत होते. एनआयएने सप्टेंबरमध्ये स्थानिक न्यायालयात एक आरोपपत्र सादर केले होते. त्या आरोपपत्रात कोरोना जिहादच्या माध्यमातून सादिया आणि डॉ. इश्फाक हे अटकेतील दहशतवादी देशात दहशत निर्माण करण्याचा कट रचत होते.

विशेष म्हणजे सादिया आणि इश्फाक यांच्या कोरोनाचा जिहादसंदर्भात झालेल्या चर्चेची माहितीसुद्धा एनआयएनं चार्जशीटमध्ये नमूद केली होती. कोरोना संकटाच्या काळात कोरोना जिहादच्या नावाखाली ते देशाला उद्ध्वस्त करण्याचा प्लॉन आखत होते.  ती त्यांची कट्टरपंथी विचारसरणी दर्शवत होती. एनआयएने सप्टेंबरमध्ये स्थानिक न्यायालयात एक आरोपपत्र सादर करत ही माहिती दिली होती.

NIAने काश्मिरी दाम्पत्य जहांगीब सामी आणि हिना बशीर बेग, हैदराबाद येथील अब्दुल्ला बासित, सादिया अन्वर शेख आणि पुणे येथील नबिल सिद्दीक खत्री यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे की, चिथावणीखोर पोस्ट टाकल्यामुळे फेसबुकने सादियाचे खाते ब्लॉक केले होते. 2015 मध्ये त्याच्या संशयास्पद वर्तनाबद्दल पुण्याच्या दहशतवादविरोधी पथकानेही मोठी चौकशी केली होती.

पाच दहशतवादी सरकारविरुद्ध द्वेष पसरवण्याचे षडयंत्र रचत होते, तसेच शस्त्रे विकत घेण्यासाठी निधी गोळा करत होते. आयईडी स्फोट घडवणे, त्यांची कट्टरपंथी विचारधारा पसरवणे आणि विविध समाजात तेढ निर्माण करण्याच्या ते प्रयत्नात होते. पुराव्यांच्या आधारावर एनआयएनं हे आरोप केले आहेत. काश्मीरमध्ये तळ बनवून इसिस ही दहशतवादी संघटना देशात घातपाताच्या तयारीत होती. त्यासाठी जहानजेब, हिना, बासित, सादिया आणि नबिल यांना त्यांनी कामाला लावले होते.

आरोपपत्रानुसार, गर्दी असलेल्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणणे, निरपराध मुस्लिमांना आरएसएसविरोधात भडकावणे, देशभरात छोट्या छोट्या कट्टरपंथी गटांना एकत्रित करणे, देशात दंगल भडकावण्यासाठी RSSच्या नेत्यांवर हल्ला करणे असे त्यांनी कट रचले होते. सीएएविरोधी चळवळीच्या आडून मुस्लिमांना इतर समाजातील लोकांविरुद्ध भडकावणे, सोशल मीडियावर त्यासाठी मोहीम राबविणे आणि दोन समाजांत तेढ वाढवण्यासाठी भिंतींवर भडक घोषणा त्यांनी लिहिल्याचं तपासातून समोर आलं होतं.

NIAने या प्रकरणात प्रथम काश्मिरी दाम्पत्याला अटक केली, त्यानंतर इतर तिघांनी त्यांचे फोन आणि लॅपटॉप फॉरमॅट केले होते. 2019 साली नाबिलने पुण्यातील त्याच्या दुकानात ड्रेन क्लिनर, अ‍ॅल्युमिनियम फॉइल आणि पाण्याच्या मदतीने ज्वलनशील हायड्रोजन गॅस बनविण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती NIAनं दिली. दंगलीच्या वेळी, गैर-मुस्लिमांच्या मालमत्तेचे नुकसान व्हावे म्हणून या गॅसने भरलेल्या बलूनला आग लावण्याचीही त्याची योजना होती.

गणपती विसर्जनात ट्रकच्या सहाय्याने यात्रेकरूंना ठार मारण्याचा होता कट

पश्चिम आशियातील दहशतवाद्यांच्या मदतीने जहानजेब आणि नाबिल भारतात आत्मघातकी हल्ले करण्याचे आणि गणपती विसर्जनात ट्रकच्या सहाय्याने यात्रेकरूंना ठार मारण्याचा कट रचत होते. त्यांना भुलीच्या इंजेक्शनने मोठ्या नेत्यांची हत्या करायची होती. एनआयएच्या ताब्यात असताना हिना हिला कोरोना झाला होता. तिच्या केलेल्या चौकशीनंतर स्पेशल टीमनं उर्वरित तिघांना 8 मार्च रोजी अटक केली होती. नंतर हे प्रकरण एनआयएकडे पाठविण्यात आले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *