कोरोनाची भीती, जपानच्या क्रुझवर 130 भारतीय अडकले

कोरोनाची भीती, जपानच्या क्रुझवर 130 भारतीय अडकले

जपानच्या योकोहामा बंदरावर उभ्या असलेल्या क्रुझ डायमंड प्रिंसेसवरील 130 हून अधिक भारतीय नागरिकांना भारतात परतण्यासाठी आणखी 11 दिवस वाट पाहावी लागणार आहे.

Nupur Chilkulwar

|

Feb 09, 2020 | 10:49 AM

नवी दिल्ली : चीननंतर जपानमध्येही आता कोरोना विषाणूचा धोका उद्भवला आहे. जपानच्या योकोहामा बंदरावर उभ्या असलेल्या क्रुझ डायमंड प्रिंसेसवरील 130 हून अधिक भारतीय नागरिकांना भारतात परतण्यासाठी आणखी 11 दिवस वाट पाहावी लागणार आहे (130 Indians stuck on cruise ). या क्रुझवर जवळपास 3700 लोक अडकून पडले आहेत. यापैकी 61 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे (Corona Virus).

या लग्झरी क्रुझवर असलेल्या भारतीयांबाबत सरकार जपानच्या संपर्कात आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही ट्वीट करत याबाबतची माहिती दिली होती.

शासकीय सूत्रांनुासार, डायमंड प्रिंसेस क्रुझवर असलेल्या 3700 प्रवाशांपैकी सहा प्रवासी हे भारतीय आहे. तर 130 भारतीय दलाचे सदस्य आहेत. सुखद बातमी म्हणजे, एकाही भारतीयाला अद्याप कोरोना विषाणूची लागण झालेली नाही. क्रुझवरील सर्व भारतीयांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

सध्या भारत डायमंड प्रिसेंस क्रुझवरील नागरिकांना सोडवण्यासाठी कुठली विषेश मोहीम चालवणार नाही. सुत्रांनुसार, जहाजावर उपस्थित भारतीयांना 19 फेब्रुवारीपर्यंत जहाजावरच राहावं लागणार आहे.

ज्या 61 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाला आहे त्यांच्यापैकी 21 जपानी, 5 ऑस्ट्रेलिअन आणि 5 कॅनडाचे नागरिक आहेत. तर इतरांबाबत अद्याप माहिती नाही. जहाजावर मोठ्या प्रमाणात लोक असल्याने हा विषाणू लवकर परसण्याचा धोका आहे, असं क्रुझ व्यवस्थापनाने सांगितलं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें