Bihar Election | कोरोनाचं निवडणुकीत मोठं आव्हान, पण काळजी घेतल्याने सर्व सुरळीत : मुंबईची कन्या आयपीएस सायली धुरत

पाटणा : “बिहारमध्ये कोरोना आणि विधानसभा निवडणुका हे आमच्या समोरचे सर्वांत मोठे आव्हान होते. पण निवडणुकीच्या काळात आम्ही सर्व नियम पाळले. सर्व बुथवर व्यवस्थित काळजी घेतली. त्यामुळे निवडणूक व्यवस्थित पार पडली,” असे मुंबईच्या कन्या आयपीएस सायली धुरत यांनी सांगितले. त्या सध्या बिहारमधील छपरा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक म्हणून कर्तव्यावर आहेत. (Corona was a big challenge for […]

Bihar Election | कोरोनाचं निवडणुकीत मोठं आव्हान, पण काळजी घेतल्याने सर्व सुरळीत : मुंबईची कन्या आयपीएस सायली धुरत
Follow us
| Updated on: Nov 12, 2020 | 11:54 PM

पाटणा :बिहारमध्ये कोरोना आणि विधानसभा निवडणुका हे आमच्या समोरचे सर्वांत मोठे आव्हान होते. पण निवडणुकीच्या काळात आम्ही सर्व नियम पाळले. सर्व बुथवर व्यवस्थित काळजी घेतली. त्यामुळे निवडणूक व्यवस्थित पार पडली,” असे मुंबईच्या कन्या आयपीएस सायली धुरत यांनी सांगितले. त्या सध्या बिहारमधील छपरा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक म्हणून कर्तव्यावर आहेत. (Corona was a big challenge for Bihar Election said Mumbai daughter IPS Sayali Dhurat)

बिहारमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका घेतल्या जात होत्या. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी बिहारमधील प्रशासनावर होती. यावेळी मूळच्या मुंबईच्या पण बिहारमध्ये आयपीएस ऑफिसर म्हणून कर्तव्यावर असणाऱ्या सायली धुरत यांच्यावर छपरा जिल्ह्याची निवडणूक आणि कायदा सुव्यस्थेची जबाबदारी होती. ती त्यांनी लिलया पेलली. यावेळी कोरोना काळात निवडणुका घ्यायच्या होत्या, त्यामुळे आम्ही सर्व बूथवर व्यवस्थित काळजी घेतली. तसेच आवश्यक ते सर्व नियम पाळले असे धुरत यांनी सांगितले.

10 वर्षांपासून कर्तव्यावर, आतापर्यंत 6 जिल्ह्यांची जबाबदारी

सायली धुरत या 2009 मध्ये पहिल्याच प्रयत्नात युपीएससीची परीक्षा पास झाल्या. आयपीएस ऑफिसर म्हणून त्यांना सुरुवातीलाच बिहार केडर मिळाले. गेली 10 वर्षे त्या बिहारमध्ये आहेत. या काळात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. गेल्या वर्षात 10 वर्षांत त्यांनी 6 निवडणुकांची जबाबदारी हाताळली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडे सुरक्षेची जबाबदती होती. या निवडणुकीच्या काळात त्यांनी रचनात्मक काम केल्याने त्यांना राष्ट्रपती पदकानेही सम्नानित करण्यात आले.

सर्वांत मोठे आव्हान गुरू गोविंदसिंह यांची जयंती

यावेळी बोलताना, “पोलीस अधीक्षक म्हणून बऱ्याच जबाबदाऱ्या असतात. कायदा सुव्यवस्था हाताळताना गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवायचे असते. आतापर्यंत 6 जिल्हे जिल्ह्यांमध्ये मी काम केले आहे. या काळात अनेक गुन्हे मी उघडकीस आणले. अनेक गुन्हेगारांना शिक्षाही झाली. पाटण्यात पोलीस अधिक्षक म्हणून कर्तव्यावर होते त्यावेळी गुरू गोविंदसिंह यांची 350 जयंती पार पडली. 12 दिवस तो कार्यक्रम होता. एका दिवसाला जवळपास 5 ते 7 भाविक यायचे आले होते. एवढं काही सांभाळणं हे आव्हान होतं,” असं त्या म्हणाल्या

मुंबईची पावभाजी, वडापाव, पुरणपोळ्या आठवतात

यावेळी त्यांनी मुंबईची आठवण सांगितली. “मी मुंबईची आहे. बिहारचा प्रवास नक्कीच वेगळा होता. इथे स्थिरावण्यासाठी खूप आव्हान होते. मी महिला अधिकारी होते. मला स्वतःला सिद्ध करायचे होते. थोडा वेळ गेला स्थिर व्हायला. पण आता सगळं व्यवस्थित सुरू आहे. महाराष्ट्र जन्मभूमी असल्याने आठवण येणं स्वाभाविक आहे. मुंबईत राहणारी व्यक्ती मुंबईला कधीच विसरू शकत नाही. असं त्यांनी सांगितलं. पण “10 वर्षे बिहारमध्ये झाली आहेत. कर्मभूमी जास्त महत्वाची झाली आहेत. इथे जास्त वेळ द्यावा लागतो. आता मुंबईत यायला खूप कमी वेळ मिळतो. आई-वडिलांनाही इथे यायला कमी वेळ मिळतो. असं त्या म्हणाल्या. तसेच, “मुंबईच्या जेवणाची खूप आठवण येते. आपली पावभाजी, वडापाव, पुरणपोळ्या खूप आठवतात. बिहारमधील लोकांना महाराष्ट्रातील पदार्थ बनवता येत नाहीत. अशी खंत व्यक्त करत महाराष्ट्राचं जेवण खूप आठवतं असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

‘बिहारमध्ये सत्ता महागठबंधनचीच येणार’, तेजस्वी यादव यांचं आमदारांना आश्वासन

Photos | बिहारच्या मुख्यमंत्रिपदापासून ’12’ पाऊलं दूर, तेजस्वी यादवांची पाटण्यात आमदारांसोबत बैठक

बिहारची निवडणूक झाली, आता महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ नक्कीच होणार: नारायण राणे

(Corona was a big challenge for Bihar Election said Mumbai daughter IPS Sayali Dhurat)

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.