बोर्डाकडून बारावीच्या निकालात हलगर्जीपणा, आतापर्यंत 21 विद्यार्थ्यांची आत्महत्या

हैदराबाद : 18 एप्रिल रोजी जाहीर झालेल्या तेलंगणा बोर्डाच्या निकालानंतर राज्यात खळबळ माजली आहे. काही वृत्तांनुसार, तेलंगणामध्ये गेल्या 10 दिवसात बारावीच्या 21 विद्यार्थ्यांनी निराशेतून जीवन संपवलंय. तेलंगणा बोर्डाच्या जवळपास 10 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती, ज्यापैकी तीन लाख विद्यार्थी नापास झाले. या धक्कादायक निकालांमुळे अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांनी जीवन संपवलंय. तेलंगणामध्ये या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात […]

बोर्डाकडून बारावीच्या निकालात हलगर्जीपणा, आतापर्यंत 21 विद्यार्थ्यांची आत्महत्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

हैदराबाद : 18 एप्रिल रोजी जाहीर झालेल्या तेलंगणा बोर्डाच्या निकालानंतर राज्यात खळबळ माजली आहे. काही वृत्तांनुसार, तेलंगणामध्ये गेल्या 10 दिवसात बारावीच्या 21 विद्यार्थ्यांनी निराशेतून जीवन संपवलंय. तेलंगणा बोर्डाच्या जवळपास 10 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती, ज्यापैकी तीन लाख विद्यार्थी नापास झाले. या धक्कादायक निकालांमुळे अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांनी जीवन संपवलंय.

तेलंगणामध्ये या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात आंदोलनही होत आहे. तेलंगणा राज्य माध्यमिक शिक्षण मंडळावर हलगर्जीपणाचा आरोप करण्यात आलाय. हैदराबादची एक खाजगी कंपनी ग्लोबलरेना टेक्नोलॉजीला परीक्षासंबंधी कामं दिली होती. पण निकाल जाहीर करताना दिरंगाई करण्यात आली, ज्याने 21 विद्यार्थ्यांचा जीव घेतलाय, तर हजारो विद्यार्थी नैराश्यात आहेत.

तेलगू विषयात 99 च्या जागी शून्य गुण

तेलंगणामधील एका विद्यार्थीनीला तेलगू विषयात 99 गुण मिळाले होते. पण निकाल जाहीर झाल्यानंतर तिला शुन्य गुण देऊन रिमार्क करण्यात आलं. बारावीत शिकणाऱ्या गज्जा नाव्याच्या बाबतीत हा प्रकार घडलाय. हाच पेपर पुन्हा तपासण्यात आला तेव्हा तिला 99 गुण मिळाले. नाव्याने याच विषयात पहिल्या वर्षी 98 गुण मिळवले होते.

9.74 लाख विद्यार्थ्यांपैकी 3.28 लाख नापास

तेलंगणा राज्याच्या माध्यमिक परीक्षेसाठी 9.74 लाख विद्यार्थी बसले होते. यापैकी 3.28 लाख विद्यार्थी नापास झाले आहेत. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनीही निकाल जाहीर करताना चुका झाल्याचं मान्य केलंय. पण विद्यार्थ्यांनी निकालामुळे आत्महत्या केल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी फेटाळलाय. पालकांनी बोर्डाविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु केलंय. हे प्रकरण माध्यमांसमोर आल्याने राज्य सरकारनेही आता एका समितीची नियुक्ती केली असून चौकशी सुरु आहे. तीन सदस्यीय समितीकडून चौकशी सुरु असली तरी हायकोर्टाने नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पुन्हा तपासण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत जनहित याचिका दाखल झाली होती.

Non Stop LIVE Update
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.