कफ सिरपमध्ये विष, 9 लहान मुलांचा मृत्यू

कफ सिरपमधील विषारी पदार्थामुळे 9 लहान मुलांचा मृत्यू झाला (poison in Cough syrup) आहे.

कफ सिरपमध्ये विष, 9 लहान मुलांचा मृत्यू

श्रीनगर : आपल्याला साधा खोकला झाला तर आपण डॉक्टरकडे जाण्यापूर्वी प्राथमिक उपचार म्हणून कफ सिरप (poison in Cough syrup) घेतो. मात्र कफ सिरपमधील विषारी पदार्थामुळे 9 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. जम्मूमधील ऊधमपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. Coldbest-PC असे विष आढळलेल्या कफ सिरपचे नाव आहे. या दुर्घटनेनंतर जवळपास 8 राज्यात या कफ सिरपच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक औषध नियंत्रक सुरिंदर मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कफ सिरप हिमाचल प्रदेशातील Digital Vision नावाची औषध कंपनी बनवते. चंदीगडच्या PGIMER अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उधमपूरच्या जिल्ह्यातील मुलांचा मृत्यू हा Coldbest-PC या कफ सिरपमधील Diethylene Glycol या विषारी पदार्थामुळे झाला आहे.

जम्मूच्या डॉ. रेनू शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या 9 लहान मुलांचा मृत्यू डिसेंबर 2019 शेवटचा आठवडा ते 17 जानेवारी दरम्यान झाला. या सर्व मुलांना Acute renal failure च्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्देवाने त्यांचा मृत्यू झाला. या सर्वांचा मृत्यू Coldbest-PC या कफ सिरपमुळे झाल्याचे निदर्शनास आले (poison in Cough syrup) होते.

या कफ सिरपमध्ये विषारी पदार्थ असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जवळपास आठ राज्यातून हे सिरप परत मागवण्यात आले. हे सिरप सिरमौर जिल्ह्यातील तयार होत असून सध्या ते बनवण्यावर बंदी घातली गेली आहे.

या सिरपच्या पुढील चाचणीसाठी जम्मूजवळील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ इंटीग्रेटीव मेडिसिन तसेच चंदीगडच्या औषध तपासणी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे. यात Diethylene Glycol नावाचा विषारी पदार्थ आढळला आहे. दरम्यान अद्याप याबाबतचा अंतिम रिपोर्ट आलेला (poison in Cough syrup) नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *