कोरोनाच्या सौम्य लक्षणांमध्ये सतत CT Scan करु नका, अन्यथा कॅन्सरचा धोका : AIIMS

सोमवारी आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, सीटी स्कॅन हे तीनशे छातीच्या एक्स-रेच्या समतुल्य आहे, हे अत्यंत हानिकारक आहे. aiims director dr randeep guleria

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:15 PM, 3 May 2021
कोरोनाच्या सौम्य लक्षणांमध्ये सतत CT Scan करु नका, अन्यथा कॅन्सरचा धोका : AIIMS
aiims director dr randeep guleria

नवी दिल्ली: कोरोनाच्या नवीन लाटेमध्ये RT-PCR चाचणीत संसर्गाचा थांगपत्ता लागत नसल्याच्याही बऱ्याच घटना समोर आल्यात. त्यामुळे रुग्णांना सीटी स्कॅन (CT-SCAN) करावे लागतेय. परंतु आता एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी अशा रुग्णांना इशारा दिलाय. सीटी स्कॅन विचारपूर्वक करायला हवे. सोमवारी आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, सीटी स्कॅन हे तीनशे छातीच्या एक्स-रेच्या समतुल्य आहे, हे अत्यंत हानिकारक आहे. तसेच कॅन्सरचा धोकाही संभवू शकतो, असंही त्यांनी सांगितलंय. (ct scan and biomarkers are being misused says aiims director dr randeep guleria)

आपल्या छातीत दुखत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा

घरातील विलगीकरणात राहणारे लोक त्यांच्या डॉक्टरांशी संपर्क साधत असतात. सॅच्युरेशन 93 किंवा त्याहून कमी होत आहे, अशक्तपणासारखी परिस्थिती आहे. आपल्या छातीत दुखत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा, असंही रणदीप गुलेरिया यांनी सांगितलंय.

सर्वाधिक बाधित राज्यांव्यतिरिक्त काही राज्यांमध्ये प्रकरणे वाढतीच

जास्त बाधित राज्यांव्यतिरिक्त काही राज्यात कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, चंदीगड, हरियाणा, कर्नाटक, केरळ, हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि मेघालय ही राज्ये बाधित आहेत, अशी माहिती गुलेरिया यांनी दिलीय.

रिकव्हरी दर चांगला

कोरोना रुग्णांचा रिकव्हरी दरही सुधारत असल्याची माहिती मंत्रालयाने दिलीय. 2 मे रोजी रिकव्हरीचे प्रमाण 78 टक्के होते, जे 3 मे रोजी 82 टक्क्यांपर्यंत पोहोचले. काही गोष्टीवर आपल्याला सतत काम करावे लागेल. दिल्ली आणि मध्य प्रदेशात नव्या रुग्णांच्या संख्येत घट दिसून येत आहे. मंत्रालयाने असे म्हटले आहे की, जर आपण संपूर्ण देशातील कोरोना मृत्यूदर पाहिला तर ते अंदाजे 1.10 टक्के आहे.

संबंधित बातम्या

NEET PG Exam Postponed: नीट पीजी परीक्षा 4 महिन्यांसाठी लांबणीवर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

कोव्हिड योद्ध्यांना आता सरकारी नोकरीत प्राधान्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

Don’t do CT-SCAN in mild symptoms of corona, AIIMS director says ’cause’