Cyclone Amphan | अम्फान वादळाचा फटका, पंतप्रधानांकडून पश्चिम बंगालसाठी 1000 कोटींची मदत जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालला तात्काळ एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली.

Cyclone Amphan | अम्फान वादळाचा फटका, पंतप्रधानांकडून पश्चिम बंगालसाठी 1000 कोटींची मदत जाहीर
Follow us
| Updated on: May 22, 2020 | 4:34 PM

कोलकाता : पश्चिम बंगाल आणि ओदिशा येथे अम्फान चक्रीवादळाने (Cyclone Amphan In West Bengal) अतोनात नुकसान केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज येथे नुकसान पाहणी दौरा केला. या चक्रीवादळाने पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम बंगालला तात्काळ एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर (Cyclone Amphan In West Bengal) केली.

त्याशिवाय, अम्फान चक्रीवादळामुळे जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत केंद्र सरकार करेल, असंही पंतप्रधानांनी जाहीर केलं.

मोदींच्या निर्णयावर ममता बॅनर्जी भडकल्या

पीएम नरेंद्र मोदी यांच्या घोषणेवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भडकल्या आहेत. त्यांच्यामते, नुकसान 1 लाख कोटीचं झालं आहे आणि पॅकेज फक्त 1 हजार कोटीचं देण्यात (Cyclone Amphan In West Bengal) येत आहे.

अम्फान चक्रीवादळामुळे 80 जणांचा मृत्यू

अम्फान चक्रीवादळाने पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये थैमान घातलं आहे. आतापर्यंत या चक्रीवादळामुळे 80 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोटी रुपयांचं आतापर्यंत नुकसान झालं आहे.

मोदींचा पश्चिम बंगाल दौरा

पीएम मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यासोबत अम्फान चक्रीवादळाने प्रभावित ठिकाणांची हवाई पाहणी केली. या दरम्यान त्यांच्यासोबत राज्यपाल जगदीप धनखडही उपस्थित (Cyclone Amphan In West Bengal) होते.

संबंधित बातम्या :

देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक पुन्हा सुरु होणार, तिकीट दर निश्चित, नियमावली जाहीर

Amfan Cyclone : कोलकात्यात अम्फान वादळाचा धुमाकूळ, 12 जणांचा मृत्यू

Lockdown 4.0 | देशात 31 मेपर्यंत लॉकडाऊन, शाळा-कॉलेज, मेट्रो-लोकल बंद राहणार

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.