शूटिंगवरुन घरी परतताना गाडीचा अपघात, दोन टीव्ही अभिनेत्रींचा मृ्त्यू

  • Updated On - 4:00 pm, Fri, 5 July 19 Edited By:
शूटिंगवरुन घरी परतताना गाडीचा अपघात, दोन टीव्ही अभिनेत्रींचा मृ्त्यू

हैदराबाद : तेलगू अभिनेत्री अनुषा रेड्डी आणि भार्गवी या दोघींना कार अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागला. या भीषण अपघातात अनुषा आणि भार्गवीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवार (17 एप्रिल) तेलंगणामधील वीकराबाद जिल्ह्यात झाला.

अनुषा आणि भार्गवी दोघी शूटिंगवरुन आपल्या घरी हैदराबाद येथे परतत होत्या. या दरम्यान विरुद्ध दिशेने ट्रक येत होता. ट्रक थेट गाडीवर येताना दिसताच अभिनेत्रीने अपघात टाळण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र गाडी झाडाला जाऊन धडकली आणि दोघींचा मृत्यू झाला.

यावेळी गाडीत एकूण चौघीजणी होत्या. या अपघातात इतर दोन अभिनेत्रीही जखमी झाल्या आहेत. जखमींवर हैदराबादच्या ओसिमानिया रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भार्गवी (20 वर्ष) आणि अनुषा (21 वर्ष) तामिळ चित्रपट इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी दोघीही स्वप्न पाहत होत्या. सध्या या दोघी छोट्या पडद्यावर काम करत होत्या. भार्गवी टीव्ही शो ‘मुत्याला मुग्गू’ या कार्यक्रमात निगेटिव्ह भूमिका साकारत होती. तर अनुषानेही काही प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. अनुषा रेड्डी तेलंगणाच्या जयशंकर भुपालापल्लीमध्ये राहते.