दिल्ली हिंसेतील मृतांचा आकडा 23, आयबी कर्मचाऱ्याचाही समावेश, न्यायालयात प्रक्षोभक भाषणांची तपासणी

दिल्लीमधील हिंसाचारातील मृतांची संख्या वाढून 23 वर पोहचली आहे. आज (26 फेब्रुवारी) 4 आणखी मृतदेह मिळाले आहेत.

Delhi High Court on Delhi Violence, दिल्ली हिंसेतील मृतांचा आकडा 23, आयबी कर्मचाऱ्याचाही समावेश, न्यायालयात प्रक्षोभक भाषणांची तपासणी

नवी दिल्ली : दिल्लीमधील हिंसाचारातील मृतांची संख्या वाढून 23 वर पोहचली आहे. आज (26 फेब्रुवारी) 4 आणखी मृतदेह मिळाले आहेत. यात एका गुप्तचर विभागाच्या (आयबी) कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. आयबी कर्मचारी अंकित शर्मा यांचा मृतदेह चांद बाग परिसरात मिळाला. अंकित बेपत्ता होते आणि याबाबत त्यांच्या कुटुंबियांकडून पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली होती. अंकित शर्मा चांग बाग भागातच राहत होते. त्यांचा हिंसाचारातील दगडफेकीत मृत्यू झाल्याचा अंदाज पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे (Delhi High Court on Delhi Violence).

चांद बाग पोलिसांना आयबी कर्मचारी अंकित शर्मा यांचा मृतदेह एका नाल्यामध्ये सापडला. ही घटना मंगळवारी (25 फेब्रुवारी) सायंकाळी घडली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर-बाबरपूर, चांद बागमध्ये झालेल्या हिंसाचारातील मृतांची संख्या वाढतच चालली आहे. यात जवळपास 200 लोक जखमी झाले आहेत. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

अंकित शर्मा यांच्या कुटुंबियांनी सांगितले, की अंकित यांच्या डोक्यावर तलवारीने वार केले आहेत. त्याच्यावर चाकूने देखील हल्ला करण्यात आला आहे. नाल्यामध्ये दगडाच्या साहाय्याने अंकित शर्मा यांचा मृतदेह पाण्यात दाबून ठेवण्यात आला होता. सुरुवातीला पीडित कुटुंब अंकित बेपत्ता असल्याची तक्रार खजूरी खास पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यासाठी गेले. मात्र, नंतर त्यांची तक्रार दयालपूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवून घेण्यात आली.

दरम्यान, दिल्ली हिंसाचारात हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांनाही आपला प्राण गमवावा लागला. दंगलीतील आरोपींच्या हल्ल्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील जखमी झाले आहेत.

“कपिल मिश्रांचा प्रक्षोभक भाषणाचा व्हिडीओ तुम्ही पाहिला नाही यावर कसा विश्वास ठेवणार?” 

दिल्ली हिंसेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांच्या कामावर गंभीर ताशेरे ओढले. न्यायालयातच कपिल मिश्रा यांचा प्रक्षोभक भाषण देतानाचा व्हिडीओ दाखवण्यात आला. यावर तुम्ही हा व्हिडीओ पहिल्यांदाच पाहात आहात यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा असाही प्रश्न न्यायालयाने विचारला. विशेष म्हणजे प्रक्षोभक भाषण देताना उत्तर-पूर्व भागाचे डीसीपी कपिल मिश्रा यांच्याशेजारी उभे होते.

न्यायालयाने पोलिसांना विचारलं की दिल्लीत दिले गेलेल्या प्रक्षोभक भाषणांचे संबंधित तीन व्हिडीओ तुम्ही पाहिले आहे का? यावर पोलिसांनी 2 व्हिडीओ पाहिले आहेत. एक नाही. यावर न्यायालयाने गंभीर नाराजी व्यक्त करत संबंधित व्हिडीओ टीव्ही चॅनलवर अनेकदा दाखवण्यात आला आहे. तरीही तुम्ही तो पाहिला नाही यावर आम्ही कसा विश्वास ठेवावा? असा थेट सवाल केला.

Delhi High Court on Delhi Violence

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *