कर्नाटकमध्ये लवकरच ऑनलाईन गेम्सवर बंदी, पैशांचा अपव्यय होत असल्याचा सरकारचा दावा

ऑनलाईन गेम्समुळे (Online Games)नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा दावा करत लवकरच त्यावर बंदी आणण्याचे संकेत कर्नाटक सरकारने  (Karnataka Government) दिले आहेत.

कर्नाटकमध्ये लवकरच ऑनलाईन गेम्सवर बंदी, पैशांचा अपव्यय होत असल्याचा सरकारचा दावा
कर्नाटकमधून ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण पळाल्याच्या माहितीला प्रशासनानं दुजोरी दिलाय.
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 10:03 AM

बंगळुरु : ऑनलाईन गेम्समुळे (Online Games)नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा दावा करत लवकरच त्यावर बंदी आणण्याचे संकेत कर्नाटक सरकारने  (Karnataka Government) दिले आहेत. कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी याबद्दल माहिती दिली आहे. ऑनलाईन गेम्सच्या नादात नागिरकांकडून मेहनतीच्या पैशांचा अपव्यय होत आहे, त्यामुळे राज्यात लवकरच ऑनलाईन गेम्सवर बंदी आणली जाईल असे बोम्मई म्हणाले. (decision of ban on online game by karnataka government)

“ऑनलाईन गेममुळे अनेक पालक त्रासलेले आहेत. अनेक पालकांच्या आपल्या पाल्यांबद्दल शिकायती आम्हाला मिळत आहेत. राज्यात अशा गोष्टींना प्रोत्साहन मिळू नये म्हणून आम्ही ऑनलाईन गेम्सवर बंदी (Online Games ban)आणण्याचा विचार करत आहोत,” असं गृहमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले. तसेच, यावेळी ऑनलाईन गेम्सला त्यांनी जुगार म्हटलं आहे.

“विद्यार्थी, लहान मुलं, मुली दिवसभर गेम खेळण्यात व्यस्त असतात. एवढंच नाही तर मोठ्या व्यक्ती आपली मेहनतीची कमाई ऑनलाईन गेम्सवर लावत आहेत. गेम्सवर असे पैसे लावणे आज एक जुगारासारखे होऊन बसले आहे.” असंही बोम्मई म्हणाले.

तसेच, ऑनलाईन गेम्समुळे अनेक परिवार त्रस्त आहेत. त्यामुळे कर्नाटक सरकार या गेम्सवर बंदी आणण्याचा विचार करत आहे. या आधीही अनेक राज्यांनी या गेम्सवर बंदी आणलेली आहे. या राज्यांकडून सूचना मागवण्यात येतील. त्यानंतर कर्नाटकमध्ये गेम्सवर बंदी आणण्यात येईल, अशी माहिती बसवराज बोम्मई यांनी दिली.

विरोधी पक्षाचाही सरकारला पाठिंबा

दरम्यान, ऑनलाईन गेम्सवर बंदी आणण्याच्या सरकारच्या विचाराला राज्यातील विरोधी पक्षाकडूनदेखील पाठिंबा मिळाला आहे. काँग्रेस नेते दिनेश गुंडु यांनी गृहमंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. या गेम्सवर नागरिक त्यांचे पैसे नको तितक्या प्रमाणात खर्च करत आहेत. त्यामुळे गेम्सवर बंदीआणायला हवी, असे म्हणत गुंडु यांनी कर्नाटक सरकारच्या ऑनलाईन गेम्सबंदीचे स्वागत केले आहे.

एका रिपोर्टनुसार लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. नागरिक एका दिवसामध्ये 6 तासांपेक्षाही जास्त वेळ ऑनलाईन गेम्स खेळण्यावर घालत आहेत. भारत देशात पबजी (PUBG) या गेमचे जवळपास 3 कोटींपेक्षा जास्त युजर्स होते. (decision of ban on online game by karnataka government)

संबंधित बातम्या :

PUBG Mobile Game भारतात परतणार; दक्षिण कोरियाई कंपनी पबजी कॉर्पोरेशनची घोषणा

PubG आजपासून पूर्णपणे बंद, मोबाईलमधील गेम चालणार नाही

चीनला पुन्हा दणका, आणखी 47 चिनी अ‍ॅपवर बंदी, आता PUBG आणि AliExpress चा नंबर?

Non Stop LIVE Update
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.