AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्ली नव्हे राम मंदिर होते हिटलिस्टवर, लाल किल्ला स्फोटाच्या चाैकशीत हादरवणारा खुलासा, दहशतवाद्यांनी…

दिल्ली लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये 9 जणांचा जीव गेला असून जखमींवर उपचार सुरू आहे. आता या स्फोटाबद्दल अत्यंत धक्कादायक अशी माहिती पुढे येताना दिसत आहे. या दहशतवाद्यांना दिल्लीमध्ये स्फोट घडवायचा नव्हता. यांचे टार्गेट वेगळेच होते.

दिल्ली नव्हे राम मंदिर होते हिटलिस्टवर, लाल किल्ला स्फोटाच्या चाैकशीत हादरवणारा खुलासा, दहशतवाद्यांनी...
Delhi blast
| Updated on: Nov 12, 2025 | 2:05 PM
Share

दिल्ली लाल किल्ला स्फोटानंतर देशभरात अलर्ट जारी करण्यात आला असून अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. दिल्ली स्फोटात काही डॉक्टरांचा समावेश असल्याने खळबळ उडाली. फक्त हेच नाही तर गेल्या काही दिवसांपासून या स्फोटाची योजना आखली जात होती. दिल्ली लाल किल्ला हे त्यांचे टार्गेट नसून त्यांचा प्लॅन यापेक्षाही कितीतरी पट खतरनाक असल्याचे आरोपींच्या चाैकशीतून पुढे येतंय. त्यांना जास्तीत जास्त लोकांना नुकसान पोहोचवायचे होते आणि त्यांची टार्गेट अयोध्या आणि वाराणसी होते. दिल्लीतील स्फोट घाईत झाल्याचे पुढे येतंय. स्फोटात वापरलेले साहित्य बांगलादेश आणि नेपाळच्या मार्गे भारतात आणले गेले. मोठा कट दहशतवाद्यांकडून आखण्यात आला होता. दहशतवादी उमर हाच गाडी चालवत होता.

विविध ठिकाणांहून अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. दहशतवाद्यांनी अयोध्या आणि वाराणसीतील राम मंदिराला टार्गेट केले होते. ज्याचे एक मॉड्यूल तयार केले होते. तपासात हे स्पष्ट झाले की, या दहशतवाद्यांना दिल्ली नव्हे तर अयोध्येत स्फोट घडवायचा होता. अटक करण्यात आलेली शाहीन हिने अयोध्येत स्लीपर मॉड्यूल सक्रिय केले होते. हल्ला करण्यापूर्वीच दहशतवाद्यांनी अटक करण्यात आली. त्यांची स्फोटकेही जप्त करण्यात आली.

आतापर्यंतच्या तपासातून असे दिसून येते की, स्फोटकांमध्ये कोणताही टायमर नव्हता. हा स्फोट घाईघाईत झाला. दहशतवाद्यांनी चाैकशीत सांगितले की, त्यांना स्फोट जास्तीत जास्त लोक असलेल्या ठिकाणी उडवायचा होता. सुरक्षा एजन्सींसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे की, उर्वरित 300 किलो अमोनियम नायट्रेट त्यांना जप्त करायचा आहे. याकरिता दहशतवाद्यांकडून कसून चाैकशी केली जात आहे. दहशतवाद्यांनी हे लपून ठेवले आहे.

माहितीनुसार, एजन्सीने आतापर्यंत 2,900 किलो स्फोटके जप्त केली आहेत. हे स्फोटके जप्त करण्यासाठी सतत छापेमारी केली जात आहे. दिल्लीत स्फोट करण्यात आलेल्या i-20 कार दिल्लीत कुठे कुठे गेली होती, याचा शोध घेतला जात आहे. गाडीत स्फोटके नेमकी कुठे भरण्यात आली, याचा शोध सुरू आहे. तीन तास जवळपास लाल किल्ल्याजवळीला पार्किंगमध्ये ही गाडी उभी होती.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....