दिल्लीतील भाजपच्या महापालिकेतील सत्तेला सुरुंग लागणार?, आपचं तगडं आव्हान; मतदान सुरू

दिल्ली महापालिकेसाठी आज सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. एकूण 1 कोटी 47 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

दिल्लीतील भाजपच्या महापालिकेतील सत्तेला सुरुंग लागणार?, आपचं तगडं आव्हान; मतदान सुरू
दिल्लीतील भाजपच्या महापालिकेतील सत्तेला सुरुंग लागणार?, आपचं तगडं आव्हान; मतदान सुरू Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 04, 2022 | 12:32 PM

नवी दिल्ली: दिल्ली महानगरपालिकेसाठी आज मतदान पार पडत आहे. गेल्या 15 वर्षापासून दिल्ली महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपसमोर आपचं मोठं आव्हान पाहायला मिळत आहे. भाजपने महापालिका निवडणुकीत देशातील सर्व राष्ट्रीय नेत्यांना रस्त्यावर उतरवून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या पार्श्वभूमीवर आज महापालिका निवडणुकीच्या मतदानातून जनता कुणाला कौल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निवडणुकीत भाजप-आप व काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या मुख्य राजकीय पक्षांसह इतर पक्षांचे एकूण 1 हजार 416  उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

दिल्ली महापालिकेसाठी आज सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. एकूण 1 कोटी 47 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राजधानी दिल्लीत एकूण 13 हजार 638 मतदान केंद्र आहेत. त्यापैकी 3356 मतदान केंद्रे संवेदनशील आहेत.

हे सुद्धा वाचा

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोची सेवा आज पहाटे 4 वाजल्यापासून सुरू करण्यात आली आहे. साधारणत: मेट्रोची सेवा सकाळी साडेपाच वाजल्यापासून सुरू होते. मतदानासाठी ही व्यवस्था अगोदरच सुरू केल्याचे डीएमआरसीने म्हटले आहे.

प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे

आपने कचरा समस्येचा मुद्या उचलून धरत भाजपवर निशाणा साधलाय.

भाजपने आपच्या कथित भ्रष्टाचारावर टीका केली आहे.

दृष्टीक्षेपात निवडणूक

एकूण मतदार- 1 कोटी 47 लाख

पुरुष- 81 लाख 5 हजार

महिला- 66 लाख 80 हजार

एकूण उमेदवार- 1416

पुरुष- 674

महिला- 742

एकूण मतदान केंद्रे- 13,638

संवेदनशील मतदान केंद्रे- 3356

पिंक मतदान केंद्रे- 68

पोलीस बंदोबस्त- 40 हजार पोलीस, 20 हजार होमगार्ड

Non Stop LIVE Update
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.