6 राज्यांच्या पोलिसांचा शोध संपला, जेएनयू स्कॉलर शरजील इमामला अखेर अटक

जवाहरलाल नेहरु विद्यापीठ अर्थात जेएनयूचा स्कॉलर शरजील इमामला (Sharjeel Imam arrests) अटक करण्यात आली आहे. देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेल्या शरजील इमामला बिहारमधील जहानाबाद इथे अटक करण्यात आली.

  • Publish Date - 3:41 pm, Tue, 28 January 20
6 राज्यांच्या पोलिसांचा शोध संपला, जेएनयू स्कॉलर शरजील इमामला अखेर अटक

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठ अर्थात जेएनयूचा स्कॉलर शरजील इमामला (Sharjeel Imam arrests) अटक करण्यात आली आहे. देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेल्या शरजील इमामला बिहारमधील जहानाबाद इथे अटक करण्यात आली. दिल्ली आणि बिहार पोलिसांनी मंगळवारी दुपारी ही संयुक्त कारवाई केली. त्याआधी पोलिसांनी सोमवारी रात्री शरजील इमामचा (Sharjeel Imam arrests) भाऊ आणि मित्राला ताब्यात घेतलं होतं.

शरजील इमामचा शोध दिल्ली, बिहार, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि उत्तर प्रदेश पोलीस घेत होते. अखेर बिहारमध्ये त्याला पकडण्यात आलं.

जेएनयूमध्ये पीएचडी करत असलेला शरजील इमामचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर, तो चर्चेत आला होता. या व्हिडीओनंतर 6 राज्यांच्या पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनात, आसामला भारतापासून वेगळं करण्याबाबत वक्तव्य शरजील इमामने केलं होतं. याशिवाय मुस्लिमांनी देशभर चक्काजाम करण्याचं आवाहनही शरजील इमामने केलं होतं.