कुतुबमिनारमध्ये पूजेची मागणी प्रकरण: न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली; पुढील सुनावणी 24 ऑगस्टला

कुतुबमिनार संकुलामध्ये हिंदू आणि जैनांना पूजेचा अधिकार मिळावा अशी मागणी न्यायालयात करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी दिल्लीच्या साकेत न्यायालयाने आता 24 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे.

कुतुबमिनारमध्ये पूजेची मागणी प्रकरण: न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली; पुढील सुनावणी 24 ऑगस्टला
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 1:34 PM

नवी दिल्ली : कुतुबमिनार (QutubMinar) संकुलामध्ये हिंदू (Hindu) आणि जैनांना पूजेचा (pooja) अधिकार मिळावा अशी मागणी न्यायालयात करण्यात आली आहे. दिल्लीच्या साकेत न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. दरम्यान आज न्यायालय या याचिकेवर निकाल देईल अशी शक्यता होती. मात्र न्यायालयाने आता या प्रकरणाची सुनावणी 24 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. हिंदू आणि जैन देवतांची पुनर्स्थापन करून कुतुबमिनार कॉम्प्लेक्समध्ये पुजा करण्याची परवानगी मिळावी, यासाठी दिल्लीच्या साकेत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणी पूर्ण करून न्यायालयाने 9 जूनपर्यंत आपला निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणात आज निकाल येण्याची श्यकता होती. मात्र या प्रकरणात नव्याने अर्ज दाखल करण्यात आलचे लक्षात आल्यानंतर न्यायालयाने आता या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली असून, येत्या 24 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

काय आहे प्रकरण?

कुतुबमिनार संकुलात हिंदू आणि जैन धर्मियांना पूजेचा अधिकार मिळावा यासाठी दिल्लीच्या साकेत न्यायालयात वकील हरी शंकर जैन आणि रंजना अग्निहोत्री यांनी एक याचिका दाखल केली होती. कुतुबमिनारची इमारत ही हिंदूंचं अस्तित्व अधोरेखित करत असल्याचा दावा या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला होता. याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते की, कुतुबमिनार परिसरात अनेक हिंदू देवी देवतांच्या मुर्ती आहेत. तसेच कुतुबमिनार परिसरात अशी अनेक चिन्हे पाहायला मिळतात जी चिन्हे हिंदू संस्कृतीचे प्रतिनिधित्त्व करतात. या परिसरात विष्णू, ऋषभ देव, शिव, गणेश, यासोबतच जैन तीर्थंकरांच्या मूर्ती देखील आहेत. त्यामुळे कुतुबमिनार संकुलात हिंदू आणि जैन धर्मियांना पूजेची परवानगी देण्यात यावी असे या याचिकेत म्हटले होते. तसेच मेरू टॉवरलाच आता कुतुबमिनार म्हणतात असा दावा देखील करण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

सुनावणी पुढे ढकलली

दरम्यान या प्रकरणातील निकाल 9 जून पर्यंत राखून ठेवण्यात आला होता. आज न्यायालय या प्रकरणावर निकाल देईल अशी शक्यता होती. मात्र आता या प्रकरणातील सुनावणी 24 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.