नीरव मोदी 28 दिवसांनंतर येऊ शकतो भारतात; पण बचावाचे अजूनही तीन मार्ग

हिरा व्यावसायिक नीरव मोदीशी संबंधित कागदपत्रे यूके गृह विभागाकडे पाठवली जाणार आहेत. त्यानंतर गृह विभागाजवळ 28 दिवसांचा वेळ असेल, जिथे तिथल्या विभागांचे सचिव हस्ताक्षर असतील.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:26 PM, 25 Feb 2021
नीरव मोदी 28 दिवसांनंतर येऊ शकतो भारतात; पण बचावाचे अजूनही तीन मार्ग
Nirav Modi extradition case

नवी दिल्लीः भारतीय तपास यंत्रणांना आज मोठं यश मिळालं आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीला (Nirav Modi) भारतात आणण्यात येणार आहे. लंडनच्या एका न्यायालयानं नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. हिरा व्यावसायिक नीरव मोदीशी संबंधित कागदपत्रे यूके गृह विभागाकडे पाठवली जाणार आहेत. त्यानंतर गृह विभागाजवळ 28 दिवसांचा वेळ असेल, जिथे तिथल्या विभागांचे सचिव हस्ताक्षर असतील. (Diamond Trader Nirav Modi May Come To India In 28 Day London Court Approves Extradition)

28 दिवसांत नीरव मोदीला भारतात आणण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार

अशा पद्धतीनं 28 दिवसांत नीरव मोदीला भारतात आणण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. परंतु नीरव मोदीजवळ आताही तीन पर्याय शिल्लक आहेत. त्या पर्यायांचा वापर करून तो स्वतःला वाचवू शकतो. नीरव मोदी जिल्हा कोर्टाच्या निर्णयाला लंडनच्या उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतो. लंडनच्या हायकोर्टातही हरल्यास नीरव मोदीकडे लंडनच्या सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय आहे.

…तर नीरव मोदी भारतात येण्यापासून वाचू शकतो

या दोन पर्यायांशिवाय नीरव मोदीकडे एक तिसरा पर्यायही आहे. तो मानवाधिकारांचं हवाला देऊन या प्रकरणातून वाचू शकतो. जर नीरव मोदीनं मानसिक स्वास्थ्य किंवा मानवाधिकारांच्या कारणांचा आधार घेतला, तर भारताच्या तुरुंगात पर्याप्त सुविधा नाहीत. नीरव मोदी यूकेच्या मानवाधिकार न्यायालयातही जाऊ शकतो. म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेला अजून एक ते दोन वर्ष लागू शकतात.

स्थानिक न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता

नीरव मोदींनी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान न दिल्यास त्याला 28 दिवसांच्या आता भारतात आणलं जाणार आहे. नीरव मोदीनं लंडनच्या जिल्हा न्यायालयातील निर्णयाला लंडनच्या हायकोर्टात आव्हान दिल्यास ही प्रक्रिया अजून लांबणार आहे. ब्रिटनचा कायदा नीरव मोदीला अधिकार देतो की, तो स्थानिक न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतो.

जिल्हा न्यायालयाच्या निर्णयातील तीन मुद्द्यांमुळे भारताची बाजू मजबूत

आता सर्वकाही नीरव मोदीवर अवलंबून आहे. परंतु लंडन जिल्हा न्यायालयाच्या निर्णयातील तीन मुद्द्यांमुळे भारताची बाजू मजबूत आहे. नीरव मोदीने पीएनबी बँकेच्या अधिकाऱ्यांशी मिळून घोटाळा केला आहे. नीरव मोदी मनी लॉड्रिंग गुन्ह्यातही सहभागी आहे. तिसरी गोष्ट म्हणजे नीरव मोदीला भारतात नेल्यास त्याला गुन्हेगार ठरवलं जाऊ शकतं. नीरव मोदीनं मानसिक स्वास्थ्याचं कारण दिल्यास त्याची भारतातही व्यवस्था केली जाईल. परंतु जर नीरव मोदीला ठेवण्यात येणाऱ्या तुरुंगात मानसिक स्वास्थ्यासाठी पर्याप्त सुविधा नसल्याचं सांगितल्यास त्याला भारतात पाठवण्यात येणार नाही.

संबंधित बातम्या

नीरव मोदीच्या भारत प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा; UK न्यायालयाचा मोठा निर्णय

नीरव मोदी लवकरच ऑर्थर रोड कारागृहात दिसणार; आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?

Diamond Trader Nirav Modi May Come To India In 28 Day London Court Approves Extradition