आधार कार्ड वापरायचं की नाही? निर्णय तुमचा

नवी दिल्ली : तुम्हाला जर आधार कार्डची गरज नसेल तर आता तुम्ही डी रजिस्टर करु शकता, मात्र यामुळे तुमचा सर्व डाटा डिलीट होणार आहे. केंद्र सरकार एका नवीन प्रस्तावावर काम करत आहे. या येणाऱ्या नव्या प्रस्तावानुसार आधार कार्डमधून जर आपलं नाव हटवले तर युजर्सची संपूर्ण माहिती डिलीट करण्यात येणार आहे. युजर्सची माहिती आणि बायोमॅट्रिक्स अशावेळी …

आधार कार्ड वापरायचं की नाही? निर्णय तुमचा

नवी दिल्ली : तुम्हाला जर आधार कार्डची गरज नसेल तर आता तुम्ही डी रजिस्टर करु शकता, मात्र यामुळे तुमचा सर्व डाटा डिलीट होणार आहे. केंद्र सरकार एका नवीन प्रस्तावावर काम करत आहे. या येणाऱ्या नव्या प्रस्तावानुसार आधार कार्डमधून जर आपलं नाव हटवले तर युजर्सची संपूर्ण माहिती डिलीट करण्यात येणार आहे. युजर्सची माहिती आणि बायोमॅट्रिक्स अशावेळी घेतले जाते ज्यावेळी कोणी व्यक्ती आधारसाठी स्वत:ची नोंदणी करते.

सप्टेंबर महिन्यात आधार कार्डवर सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय देत, आधार कार्ड बँक सोबत लिंक करणे गरजेचे नाही आणि मोबाईल कंपन्यासुद्धा सिमसाठी आधार कार्ड मागू शकत नाही, असं स्पष्ट केलं होतं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आधार कायद्यातील कलम 57 नुसार आता खासगी कंपन्यांनाही व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्ड वापरण्याचा कोणताच अधिकार नाही.

आधार कार्ड धारकाचं 18 वर्षे वय झाल्यानंतर सरकार त्यांना सहा महिन्यांची मुदत देणार आहे. आधार कार्ड वापरायचे की नको हा त्यांचा निर्णय असेल. वृत्तानुसार भारतीय सरकारने आतापर्यंत 37.50 कोटी पॅन नंबर वाटले आहेत. हा आकडा मार्च 12/2018 पर्यंतचा आहे. त्यात फक्त 16.84 लोक असे आहेत ज्यांच्याकडे पॅन कार्ड सोबत आधार कार्ड आहे.

हा प्रस्ताव जर अमंलात आणला तर अनेकांना याचा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजही अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही किंवा त्यासाठी लागणारे पुरेसे कागदपत्रे नाहीत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *