संपूर्ण देशात कसली चर्चा संसदेत खासदार राहुल गांधी यांनी थेट सांगितलं, राहुल गांधी यांच्या भाषणात कुणावर निशाणा?

किरण बाळासाहेब ताजणे, Tv9 मराठी

|

Updated on: Feb 07, 2023 | 3:22 PM

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान राहुल गांधी यांनी संसदेत भाषण करत असतांना भारत जोडो यात्रेचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

संपूर्ण देशात कसली चर्चा संसदेत खासदार राहुल गांधी यांनी थेट सांगितलं, राहुल गांधी यांच्या भाषणात कुणावर निशाणा?
Image Credit source: Google

दिल्ली : संसदेत सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. याच दरम्यान कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भाषण केलं आहे. यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेचे अनुभव सांगत केंद्र सरकारच्याबद्दल लोकांच्या मनात काय सुरू आहे याचे काही उदाहरणं देत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. यामध्ये संपूर्ण देशात फक्त उद्योगपती गौतम अडाणी (Gautam Adani) यांच्याच नावाची चर्चा सुरू असल्याचा टोला लगावत त्यांचे आणि पंतरप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध काय आहे? असाही सवाल राहुल गांधी यांनी करत अडाणी हेच प्रत्येक व्यवसायात कसेकाय घुसतात असा सवालही केला आहे.

खासदार राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान बोलत असतांना अडाणी यांनी कोणत्या कोणत्या व्यवसायात शिरकाव केला आहे. त्याबद्दल भाष्य करत काही सवाल केले आहे.

याशिवाय राहुल गांधी यांनी अजित डोवाल यांची अग्निवीर योजना भारतीय सैन्य दलावर कशी लादली आहे हे सांगत अग्निवीर योजनेवर बोट ठेवलं आहे.

हे सुद्धा वाचा

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हंटलंय, भारत जोडो यात्रा सुरू केली तेव्हा सुरुवातीला थोडी अवघड गेली, पण नंतर नागरिकांशी बोलायला लागलो तेव्हा यात्रा सोपी झाली.

तेव्हा काही लोकं माझ्याशी येऊन बोलत होते, मला काही प्रश्न विचारात होते, त्यामध्ये काही लोक म्हणाले प्रत्येक व्यवसायात अडाणीच कसे काय दिसतात, अडाणी यांनी इतक्या कमी वेळेत इतके व्यवसाय कसे सुरू केले?

उद्योगपती गौतम अडाणी यांचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काय संबंध आहे. असे विविध प्रश्न भारत जोडो यात्रेच्या दरम्यान लोकांनी मला विचारले आहे असं राहुल गांधी यांनी म्हंटलं आहे.

भारत जोडो यात्रेत काही तरुण भेटले त्यांनी आम्हाला सांगितले की पूर्वी आर्मीत लागले की पेन्शन मिळायची, जास्त काळ नोकरी असायची आता चारच वर्षे आर्मी भरती का? पेन्शन पण नाही मिळणार असे का?

अग्निवीर योजना अजित डोवाल यांनी लादली आहे का? असे विविध प्रश्न मला युवकांनी विचारले आहे असे सांगत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

संसदेत हे मुद्दे मांडत असतांना राहुल गांधी यांनी काही फोटो दाखविण्यास सुरुवात केली होती. त्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आक्षेप घेत पोस्टर दाखवू नका म्हणून गोंधळ सुरू केला त्यावर विरोधकांनीही गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती.

काही वेळेतच राहुल गांधी यांचे भाषण पुन्हा सुरू झाले. त्यामध्ये राहुल गांधी यांनी गौतम अडाणी यांना एयरपोर्ट कसे काय दिले? प्रत्येक क्षेत्रात अडाणी हेच कसे काय दिसतात असे म्हणत त्यांचे आणि मोदींचे काय संबंध आहे हे सांगून द्या असे राहुल गांधी म्हणाले आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI